महाराष्ट्र

राक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख

सरपंच सौ रंजनाताई कातकडे यांच्या हस्ते किराणा किटचे वितरण

ग्रामपंचायत राक्षी यांच्याकडून ५% निधी मधून दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप सरपंच रंजनताई कातकडे , उपसरपंच भारत कातकडे सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक देविदास पंडित,सावली दिव्यांग संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांगाना किराणा वाटप सरपंच सौ रंजनताई कातकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राक्षी ग्रामपंचायतचे सरपंच रंजनाताई कातकडे, उपसरपंच भारत कातकडे,सदस्य अमोल कातकडे ,भक्तराज कातकडे ,गुलाब मगर ,राजेंद्र गोरे , अफसर शेख ,ज्ञानदेव कातकडे, ग्रामसेवक देविदास पंडित ,ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब मगर ,नयुम शेख , सावली चे सोशेल मिडिया प्रमुख बाबासाहेब गडाख व दिव्याग बांधव उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत कडून पाच टक्के निधी वाटप केल्यामुळे दिव्यांग बांधवांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,सावली संघटनेचे तालुका अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी गुठे,सचिव नवनाथ औटी,खलील शेख,मनोहर मराठे,अनिल विघ्ने, गणेश महाजन, सुनील वाळके,बाहुबली वायकर,महिला जिल्हाध्यक्षा निर्मला भालेकर, चंद्रकला चव्हाण,सोनाली चेडे,सुवर्णा देशमुख, निलोफर शेख सर्व सावलीच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवाना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होत असल्याचे यावेळी सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख यांनी सांगितले.त्याच बरोबर राक्षी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्वं सदस्य, ग्रामसेवक, चेअरमन ,ग्रामस्थ तसेच सर्व गावातील दिव्यांग बांधव यांच्यासह विशेषतः कर्तव्यदक्ष ग्रामसेवक देविदास पंडित साहेब यांचे बाबासाहेब गडाख यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे