ब्रेकिंग

शेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

अनेक इच्छुकांचा हिरमोड

 शेवगाव नगरपरीषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज सोमवार ता.१३ रोजी तहसिल कार्यालयात नियंत्रण अधिकारी तथा भुसंपादन उपजिल्हाधिकारी संदिप चव्हाण, तहसिलदार छगन वाघ, मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, सोमनाथ नारळकर, अरुण चोगे, प्रशांत सोनटक्के,, कृष्णा देवढे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. आजच्या सोडतीमध्ये अनेक इच्छुकांचे प्रभाग महिला आरक्षीत झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

सकाळी ११.३० वाजता प्रज्ञा विष्णू दळे, ऋती किशोर जायभाये या दोन लहान मुलींच्या हस्ते अनुसुचित जातीच्या लोकसंख्येवर आधारीत संबंधीत प्रवर्गातील चार राखीव जागांपैकी दोन चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यात प्रभाग-९ मधील अ) व प्रभाग-५ मधील अ) अशा दोन जागा अ.जा महिलासांठी तर प्रभाग-१ अ) व प्रभाग १० अ या दोन जागा अ.जातीसाठी सर्वसाधारण राखीव निघाल्या. उर्वरीत २० जागांपैकी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नऊ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी अकरा जागा ठेवण्यात आल्या आहेत. २४ पैकी ११ जागा या सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
नगरपरीषदेच्या २४ जागांसाठी १२ प्रभागांची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे –

प्रभाग-१) अ) अनु.जाती, ब) सर्वसाधारण ( स्त्री), प्रभाग-२) अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग-३) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, 

प्रभाग -४) अ) सर्वसाधारण (स्त्री) ब) सर्वसाधारण, प्रभाग-५) अ) अ.जाती (स्त्री), ब) सर्वसाधारण,

प्रभाग -६) अ).सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-७) अ) सर्वसाधारण – (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-८) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-९) अ) अनु.जाती (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-१०) अ) अनु.जाती, ब) सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग-११) अ)-सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-१२) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण
शेवगाव नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग १२ मधून २४ उमेदवारांना निवडून दयायचे आहे. मात्र एका प्रभागातून दोन उमेदवार निवडून दयायचे असल्याने उमेदवार देतांना सर्वच पक्षांची प्रभागातील इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार आहे. मागील निवडणुकीतील अनेक प्रभागांची तोडफोड झाल्याने प्रभागांची रचना बदलल्याने जातीची समिकरणे व इच्छुक उमेदवार देखील बदलणार आहेत. अनेक प्रभाग महिलांसाठी तर अनुसुचीत जातीसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी दुस-या पर्यायी जागेची चाचपणी भावी नगरसेवकांना करावी लागणार आहे. आरक्षण सोडतीनंतर सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याने शहरातील वातावरण ढवळून निघणार आहे.

 

मतदार यादी कार्यक्रम पुढीलप्रमाणे – 

२१ जून – प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे

२१ ते २७ जून – हरकती व सूचना. १ जुलै- अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे.

५ जुलै- प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे.

प्रभागाची संख्या १२ असणार असून, सदस्यसंख्या २४ असणार आहे. अनुसूचित जातीकरिता ४, त्यामध्ये अनुसूचित जाती महिलाकरिता २, सर्वसाधारण महिलाकरिता १० जागा आरक्षित असणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे