महाराष्ट्र

किरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान

बातमी प्रतिनिधी - अजय नजन

 

अहमदनगर जिल्हा परिषद येथे अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तसेच अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन २०२१/२२ या वर्षीचा पुरस्कार सहाय्यक अभियंता किरण साळवे यांना देण्यात आला साळवे हे सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे कार्यरत आहेत अतीशय पारदर्शक कारभारासाठी साळवे यांचे नाव घेतले जाते अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक घरकुलांचे प्रश्न साळवे यांनी मार्गी लावले अभियंता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र परदेशी दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता सतीष कानेटकर जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राऊत आदी अधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे