महाराष्ट्र

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता

शेवगाव येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव व पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने पुनीत सागर अभियाना अंतर्गत वडुले बु येथील नंदिनी  नदीची स्वच्छता, आणि प्लास्टिक मुक्त भारत जनजागृती करण्यात आली.
सातारा  महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, ऍडम ऑफिसर रणदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पुनीत सागर अभियानांतर्गत जलसाक्षरता व जलस्वच्छता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी केले. त्यांनी जलसाक्षरता व जल स्वच्छता हीच खरी देशसेवा आहे, समाजात जास्तीत जास्त जलसाक्षरता होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात गणेश विसर्जनाच्या ठिकाणी जमा झालेला प्लास्टिकचा कचरा व इतर ओला कचरा जमा करून नदीची स्वच्छता करण्यात आली तसेच एनसीसीच्या छात्र सैनिकांनी वडुले गाव येथे जाऊन जलसाक्षरता रॅली काढली व प्लास्टिक मुक्त भारत करण्याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वडुले गावचे सरपंच श्री प्रदीप काळे, सोसायटी चेअरमन  प्रभाकर डमाळ, भिमराज सागडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला अकोलकर, भारदे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हरीश भारदे, रमेश भारदे आदी उपस्थित होते. कॅप्टन भाऊसाहेब शिंदे व लेफ्टनंट नारायण गोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे