महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड

शेवगाव / प्रतिनिधी

ता,२५: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार सचिन सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिर्डी येथे संपन्न झालेल्या पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकारी व पत्रकारांच्या बैठकीमध्ये प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी सर्वानुमते निवड केली. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, अनिल रहाणे यांच्या हस्ते सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.
सातपुते हे २००६ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून छायाचित्रकार व पत्रकार म्हणून त्यांनी विशेष लौकीक मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचे केलेले संघटन व त्यामाध्यमातून राबवलेले विविध समाजोपयोगी उपक्रम याची दखल घेवून आरोटे यांनी ही निवड घोषीत केली. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य नीलकंठ कराड, जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके, कैलास बुधवंत, रमेश चौधरी, अनिल कांबळे, जगन्नाथ गोसावी, संदीप देहाडराय महादेव दळे, याकुब शेख, अकबर सय्यद, कुंडलिक घुगे, रावसाहेब मरकड, जनार्धन लांडे, अलीम शेख, राजू घुगरे, रविंद्र उगलमुगले, गणेश देशपांडे, राजेंद्र पानकर, उध्दव देशमुख, बाळासाहेब खेडकर, विजयकुमार लढ्ढा, रावसाहेब निकाळजे, शाम पुरोहीत, अनिल खैरे, सुरेश बडे, कपील शेख, विजय धनवडे, सोमनाथ लोखंडे, युनूस शेख, दादा डोंगरे, रेवणनाथ नजन, इसाक शेख, नरहरी शहाणे, जयप्रकाश बागडे, लक्ष्मण मडके आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्न समजावून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. या निवडीबद्दल सातपुते यांचा मराठा सेवा संघ, घाडगे अमृततूल्य, अखिल भारतीय सरपंच परीषद, जाणता राजा युवा ग्रुप, महाराष्ट्र अॅग्रो, साम्राज्य युवा ग्रुप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व माध्यमिक शिक्षक संघटने कडून श्री सचिन सातपुते यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना निवृत्ती झाडे, राहुल ज्योतिक, गोरक्ष घोडसे आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

शेवगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते व इतर मान्यवर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे