आपला जिल्हा

अहमदनगर जिल्हयाची आजची एकूण रुग्ण संख्या 1338 आहे धक्कादायक:- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आज वाढले ४५७ रुग्ण ;

अहमदनगर लक्ष्मण मडके news18marathi:-

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 511, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटीजेन चाचणीत 172 रुग्ण बाधीत आढळले.

अहमदनगर जिल्हयाची आजची एकूण रुग्ण संख्या 1338 आहे

अहमदनगर नगर शहर =457,

संगमनेर = 148,

राहाता = 140 आणि

कोपरगावमध्ये 101

अकोले = 74

शेवगाव= 71

श्रीरामपूर = 69

नगर ग्रामीण =51

या सर्व तालुक्यांमध्ये आजची कोविड रुग्ण संख्या 50 च्या वर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असून या पार्श्वभूमीवर आगामी होळी, धुलीवंदन, रंगपंचमी सणाच्या दरम्यान गर्दी वाढण्याची शक्‍यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत.
दिनांक 28 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही धार्मिक अथवा संस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाही. खाजगी अथवा सार्वजनिक मोकळ्या जागा, सभागृह, हॉटेल, रेस्टॉरंटआदी ठिकाणी गर्दी जमल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशात देण्यात आला आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे