महाराष्ट्र

डॉ कलाम आंतराष्ट्रीय जीवनपट लघुपट स्पर्धा

नेवासा news18marathi

डॉ. कलाम यांच्या खर्‍या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी व त्यांचा जीवनपट इतरांना मार्गदर्शक होण्याच्या उद्देशाने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने युवा पिढीसाठी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केलेली आहे. पद्मभूषण ए. आर. रहमान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर इंटरनेशनल शॉर्ट फिल्मचे पोस्टर लाँच केले. डॉ. कलाम यांचे शब्द आजही लोकांच्या कानात पडतात तेव्हा त्यांच्या कार्याचा आदर केला जातो. डॉ. कलाम यांच्या जीवनातील विविध पैलूंचे उत्कृष्ट वर्णन नवीन पिढीसमोर आणण्यासाठी व नवोदित कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेसाठी पाच वेगवेगळ्या थीम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
या लघुपट निर्मिती साठी खालील ५ थीम वर आधारित फिल्म अपेक्षित आहे
१) डॉ कलाम एक उत्कृष्ट शिक्षक
२) डॉ कलाम मिसाईल मॅन ऑफ इंडिया
३) डॉ कलाम एक शासर्गन्य
४) डॉ कलाम इंडिया व्हिजन २०२०
५) डॉ कलाम पीपल्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया
याप्रमाणे तरुण कलाकार चांगल्या कल्पनेसह त्यांच्या अभिनव कल्पना सादर करतात. डॉ. कलामांना ही एक श्रद्धांजली तसेच व्हिज्युअल ट्रीट असेल जे त्यांना व त्यांच्या कार्यास प्रेरणेचे स्रोत मानतात. साधारणपणे 3 ते 20 मिनिटांच्या कालावधीचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर लघुपट (छोटा व्हिडीओ) बनवायचा आहे. या स्पर्धेमध्ये वय 18 वर्षांवरील सर्व मुलांसाठी खुले आहे. प्राप्त झालेल्या लघुपटातून योग्य लघुपट प्रख्यात निर्णायक मंडळाद्वारे निवडला जाईल. आणि जे सर्वोत्कृष्ट 3 चित्रपट विजयी चित्रपट म्हणून निवडले जातील त्यास रोख किंमतीने पुरस्कार दिले जातील.
१) प्रथम पारितोषिक – रुपये ५ लाख + ट्रॉफी + सन्मान पत्र
२) द्वितीय पारितोषिक – रुपये ३ लाख + ट्रॉफी + सन्मान पत्र
३) तृतीय पारितोषिक – रुपये १ लाख + ट्रॉफी + सन्मान पत्र
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशन कडून कळविण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा. https://www.apjabdulkalamfoundation.org/shortfilm/form अधिक माहितीसाठी संकेत स्थळास भेट द्यावी किंवा थेट हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, तामिळनाडू येथे 9486661931 ; 04573 221931 ह्या क्रमांकावर संपर्क करावा.
अशी माहिती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे श्री. अशोक लांडगे ( नेवासा तालुका समन्वयक ) यांनी कळविले आहे.
धन्यवाद

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे