आपला जिल्हा

40%अनुदानावर आलेल्या शाळा व तुकड्यावरील शिक्षकांना संस्थेचे सभासद करणार मा. भाऊसाहेब कचरे सर

लक्ष्मण मडकेपाटील news18marathi:-

अहमदनगर:- अहमदनगर नगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे सभासद म्हणून ४०% अनुदानावरच्या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सभासद करून घेणार असल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले की 20 अनुदानावर शाळा तुकड्या आल्यापासून अनेकानी संस्थेचे सभासद करून घेण्याची विनंती केली होती परंतु ,श्री भाऊसाहेब कचरे सर यांनी 40 टक्के अनुदान मिळाल्यानंतर सर्व 40% अनुदान प्राप्त शिक्षक बंधू भगिनींना सभासद करून घेण्याचे आश्वासन निवडुकी पूर्वी दिले होते त्याची निश्चित परिपूर्तता करणार असल्याचे भाऊसाहेब कचरे सर यांनी सांगितले त्यासाठी कोणतीही शिष्टमंडळे भेटायला येण्याची आवश्यकता नसल्याचे कचरे सर यांनी सांगितले.संस्थेच्या प्रत्येक शाखेमधून योग्य ते मार्गदर्शन सर्वाना होईल कोणतीही अडवणूक होणार नाही तसेच सभासद झाल्यानंतर वेतनाच्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे
यावेळी कचरे म्हणाले की, या विनाअनुदानित शाळेना अनुदान मिळण्यासाठी बराचशा कालावधी गेल्यामुळे या शाळेच्या सभासदांच्या हिताकरीता हा निर्णय घेतला आहे. या होणाऱ्या सभासदांना त्यांच्या पगाराच्या प्रमाणात कर्ज मिळेल,परंतु सोसायटीच्या सर्व सभासद हितांच्या योजनाचा फायदा मिळेल.
सभासद होण्यासाठी कोणीही निवेदन देण्याची किंवा शिष्टमंडळ आणण्याची गरज नसल्याचेही कचरे यांनी सांगितले. ४० % अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांनी संस्थेला सभासद करून घेण्याचा संस्थेचा छापील फॉर्म व शैक्षणिक संस्थेची पगारातून कर्ज वसुलीची हमी, आणि आवश्यक ती कागदपत्रे दिली की संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये सभासद करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री .चांगदेव खेमनर, व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर काळे व सर्व संचालकांनी सांगितले आहे. या निर्णयाचे संस्थेचे सभासद संजय भुसारी ,जयकिसन वाघपाटील यांच्या सह सर्व सभासद हीतचिंतकांनी संचालक मंडळाचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे