
जि. प. प्रा.केंद्र शाळा , चापडगाव या शाळेत आज दि.13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .याप्रसंगी पावसाचे वातावरण असताना देखील सर्व मुले आनंदाने सहभागी झाले होते. शाळेतील मुलींनी साड्या घालून छानशी वेशभूषा केली होती .सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मृदंगच्या तालावर पावल्यांचा ठेका धरून आनंद घेतला .तसेच सर्व शिक्षक व अनेक विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फुगडी चा डाव हे ठरले कारण, फुगड्यामध्ये सर्व शिक्षक ,विद्यार्थी,शाळेचे माजी विद्यार्थी तसेच खिचडी शिजवणाऱ्या ताई देखील सहभागी झाल्या होत्या .
आज सर्व विद्यार्थ्यांनी, दररोज शाळेत येताना आम्ही आमच्या आई वडिलांचे दर्शन घेऊनच शाळेत येऊ असा संकल्प या निमित्ताने केला.याप्रसंगी मृदंगाची साथ मुख्याध्यापक श्री. भगत सर यांनी दिले .तसेच कार्यक्रमासाठी श्री. गितखने सर , श्री.गटकळ सर ,श्री. आमले सर,श्रीमती.साळवे मॅडम ,श्रीमती.गमे मॅडम ,श्रीमती.रोडे मॅडम व मुख्याध्यापक श्री. भगत सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले .शाळेचे माजी विद्यार्थी ,ग्रामस्थ व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते