महाराष्ट्र
जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती
अहमदनगर / प्रतिनिधी

लोकनेते श्री.मारुतरावजी घुलेपाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी येथे विद्यार्थ्यांनी आजादी का अमृत महोत्सव निमित्त रॅली काढुन जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी गावातुन रॅली काढुन ‘ हर घर तिरंगा’ जनजागृती केली. आणि आजादी का अमृत महोत्सवा निमित्त जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातुन रॅली काढुन जनजागृती केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा घेऊन विविध घोषणा देत, १३ ते १५ ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा ” यावर जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास भारस्कर, रावसाहेब घनवट,सुधाकर उगले,श्रीमती माया मुळे,प्रकाश उगलमुगले,आबासाहेब वाघमारे, अमोल लोखंडे,बाळासाहेब उगले,जगदिश आरेकर,अशोक खंडागळे,रघुनाथ पटारे,जयकिसन वाघ यांनी सहभाग घेतला.