ब्रेकिंग

दरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “

शेवगाव / प्रतिनिधी

दिनांक १०/०८/२०२२ रात्री शेवगाव ते गेवराई जाणारे काही इसम हे शेवगाव शहरात कोठेतरी दरोडा टाकणार असुन ते सध्या शेवगाव ते गेवराई जाणारे रोडलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याचे टपरीचे आडोशाला बसुन दरोडा टाकण्याची तयारी करत आहेत अशी बातमी पोलीस निरीक्षक श्री विलास एस. पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री. विलास एस.पुजारी यांनी सहा.पोलीस निरीक्षक श्री बागुल सहा. पोलीस निरीक्षक, आशिष शेळके, रात्रगस्त ड्युटीचे अंमलदार पो. ना / ३५ रामेश्वर वसंत घुगे,चा.पो.ना. संभाजी धायकतडक, पो.ना अशोक लिपणे, पो.ना नागरगोजे तसेच होमगार्ड झिरपे, होमगार्ड शेकडे यांना तात्काळ शेवगाव पोलीस स्टेशन येथे बोलावून बातमीतील हकीगत समजावून सांगून तात्काळ शेवगाव पोलीस स्टेशनची शासकीय जीप क्रमांक MH-१६ N-३३१ मधुन बातमीतील नमुद ठिकाणी रवाना झाले असता, बातमीतील माहिती प्रमाणे शेवगाव ते गेवराई जाणारे रोडलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याचे टपरीचे आडोशाला पाच इसम बसलेले शासकीय वाहनाचे हेडलाईटचे उजेडात दिसुन आल्याने जागीच वाहन थांबुन सदर इसमांकडे पोलीस पथक गेले असता सदरचे बसलेले इसम पोलीसांना पाहून पळू लागले त्यामुळे पोलीस पथकाने सदर इसमांपैकी चार जणांना पाठलाग करून पकडले एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला. पकडलेल्या इसमांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मंगेश नामदेव मडके वय २२ वर्षे २) संकेत संतोष जगताप वय २२ वर्ष ३) निलेश ऊर्फ कानिफनाथ राजन ऊर्फ सजन नेमाने वय १९ वर्षे सर्व रा. चापडगाव ता. शेवगाव ४) आकाश रोहिदास तेलोरे वय २० वर्षे रा. वरखेड सांगवी ता. शेवगाव असे असल्याचे सांगितले व पळुन गेलेल्या इसमाचे नाव ५) (अनिल मातंग रा. हातगाव ता.शेवगाव) असे असल्याचे सांगितले. सदर इसमांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य- एक लोखंडी चमकदार दोन अर्धगोलाकार पाते असलेली फरशी कुन्हाड, एक लोखंडी गज, एक पिवळ्या रंगाची नायलॉन दोरी, लाल मिरची पुड , एक लाकडी दांडा तसेच दोन मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १,४०,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. फरार आरोपी अनिल मातंग रा. हातगाव ता.शेवगाव याचे विरूद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. ४८९/२०२२ भादवि कलम ३९४, ५११ प्रमाणे
२) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. १०९/२०२१ भादवि कलम ३५४,४५२,५०४, ५०६, ३४ प्रमाणे
३) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. ८३/२०२२ भादवि कलम ४३६, ४३५, ४२९, ४२७,५०४, ५०६, ३४ प्रमाणे
 ४) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं १५२/ २०२० भादवि कलम ३०२, ३०७,३५४.१४३, १४७, १४८.१४९ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे
५) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. ९१८/२०२० भादवि कलम १८८, २६९,२७० पेडेमिक डिसीज अॅक्ट २.
   सदर कामगिरी मा.मनोज पाटील सो, पोलीस अधीक्षक, अहमदनगर मा. सौरभ कुमार अग्रवाल सो, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. संदीप मिटके सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव उपविभाग शेवगाव, विलास एस. पुजारी पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री. रविंद्र बागुल, स.पो.नि. श्री. आशिष प. शेळके, पो.ना. आर.व्ही.घुगे, पो.ना/ अशोक लिपणे, चा.पो.ना संभाजी घायतडक, पो.ना राजेंद्र नागरगोजे, पो.शि.सुनिल रत्नपारखी यांनी केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे