गुन्हेगारी

दारूड्या बापाने मुलाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; उपचारा दरम्यान  मुलाचा मृत्यू

अहमदनगर (लक्ष्मण मडके)   –   दारुच्या नशेत आपल्या मुलाच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्यास गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील आखेगाव येथे मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ गोरख करपे या इयत्ता १२ वीत शिकणा-या १८ वर्ष वयाच्यायेथे अधिक उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मयत मुलाच्या आई ताराबाई गोरख करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीसात मयत मुलाचे वडील गोरख किसन करपे यांच्यावर गुन्हा करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आली. या घटनेतील आरोपी गोरख करपे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती पुढील प्रमाणे आखेगाव येथे गोरख करपे हे आपली पत्नी ताराबाई व मुले रवींद्र व सोमनाथ यांच्यासह राहण्यास आहेत. त्यांचा १८ वर्षाचा लहान मुलगा गोरख हा इयत्ता बारावी मध्ये शेवगाव मध्ये शाळेत जात होता. पती गोरख करपे हे नेहमी दारू पिवून घरी येवून घरच्यांना शिवीगाळ करीत असल्याने त्यांच्यात कायम किरकोळ वाद सुरु होते. सोमवार दि.२९ रोजी सायंकाळी गोरख करपे हे दारू पिवून आले त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीने तुम्ही सणाचा दिवस असताना का पिवून आले याचा जाब विचारला असता मुलगा सोमनाथ हा मध्ये आल्याने पती गोरख यांनी शिवीगाळ केली त्यानंतर ताराबाई व व मुलगा सोमनाथ आपल्या शेतातील उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता पहाटे ३.३० च्या सुमारास मुलगा सोमनाथ याचा ओरडल्याचा आवाज आल्याने आई ताराबाई त्याच्याकडे पळत गेल्या त्यावेळी पती गोरख करपे हे मुलाला हातातील लोखंडी गजाने डोक्यात मारीत होते. मुलगा सोमनाथ हा शेतीच्या  बांधावर खाली पडलेला होत्या. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते, तो गंभीर जखमी झाला होता. मुलगा सोमनाथचा आवाज ऐकून शेजारील लोक जमा झाले. त्यांनी जखमी सोमनाथ यास शेवगावी खाजगी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी अहमदनगर येथे घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याला नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करून औषधोपचार सुरु असतांना तो मयत झाला. याबाबत पोलिसांनी गोरख करपे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे