शेवगाव प्रतिनिधी -मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा इदगाह मैदान येथे आधार नोंदणी कॅम्प ला उस्फुर्त प्रतिसाद……
शेवगाव / प्रतिनिधी

शेवगाव / प्रतिनिधी (लक्ष्मण मडके ) -मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा इदगाह मैदान येथे आधार नोंदणी कॅम्प ला उस्फुर्त प्रतिसाद……
युवा नेते अजिंक्य लांडे, इम्रान शेख आणि मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे संचालक जमीर पठाण सर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी आधार नोंदणी कॅम्प चे आयोजन केले होते, शासनाचे जास्तीत जास्त आधार नोंदणीचे धोरण आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या दुहेरी हेतूेने आज मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे संचालक श्री. जमीर सर आणि युवा नेते अजिंक्य लांडे आणि इम्रान शेख यांनी पुढाकार घेऊन सदरील नोंदणी कॅम्प लाऊन लोकांना सेवा दिली सदरील नोंदणी कॅम्प च्या ठिकाणी नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती.
शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमात मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा ही नेहमी अग्रेसर असते याची प्रचिती या कार्यक्रमातून झाली.
शासनाचे घरघर आधार आणि जास्तीत जास्त आधार नोंदणी चे धोरण पूर्णत्वाकडे नेन्ह्यासाठी शेवगाव आधार केंद्र चे प्रमुख श्री.आसिफ सय्यद सर यांनी चांगलेच मनावर घेतलेले दिसते, शासनाच्या या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आधार केंद्राचे प्रमुख श्री. आसिफ सय्यद यांच्या मार्गदरशनाखाली दिनेश हरवणे तसेच सुपरवाईजर अशोक सौदागर, योगेश खर्चन यांच्या अथक परिश्रमाने सदरील नोंदणी कॅम्प कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला
यावेळी नागरिकांनी भरपूर गर्दी केली असल्याने वेळ अपूर्ण पडल्याने बऱ्याच लोकांचे काम शिल्लक राहिले
असता पुन्हा एक दिवस ठरून आपणाला नोंदणी कॅम्प देऊ असे आश्वासन श्री आसिफ सय्यद यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त श्री जलील राजे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.तुफेलभाई मुलांनी,
प्रेमजी अंधारे हुसेनभाई पठाण, तन्वीर पटेल नवाज शेख,मोहसीन शेख, अन्वर सय्यद,अक्रम शेख, किरण अंधारे, इस्माईल शेख, इरफान पठाण, अमीन सैयद, बाबाभाई पठाण, राजूभाई शेख आदींनी परिश्रम घेतले.