महाराष्ट्र

राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान – सविता मुळे

हाजी युसुफखान पठाण यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित

 आपली खरी ओळख निर्माण होत असते. कारण ते नवीन संधी निर्माण करुन देतात. सदय स्थितीत पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना त्याची एकाच वेळी कौटुंबिक, शैक्षणिक, भावनिक गरज पूर्ण करण्याचे काम करावे लागत आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे आहे. प्रतिपादन औरंगाबाद येथील शारदा मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापक सविता मुळे यांनी केले.शेवगाव येथे रोटरी क्लब आँफ शेवगाव सिटीच्या देण्यात येणा-या राष्ट्र उभारणीचे शिल्पकार या पुरस्काराच्या वितरण प्रसंगी मुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्नेहलता लबडे होत्या. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष लाहोटी, सचिव डॉ. मयूर लांडे, डॉ. संजय लड्डा, बाळासाहेब चौधरी, भागनाथ काटे, किसन माने आदी प्रमुख उपस्थित होते.हाजी युसुफखान पठाण यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून यशस्वी भरारी घेत फॅब्रिकेशन व शेड उभारणी कामात आगळावेगळा ठसा निर्माण केलेला आहे. त्यांनी फक्त नगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठमोठी शेड उभारण्याची कामे यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत.

यावेळी औदयोगिक क्षेत्रात भरारी घेणा-या अंजूम फेब्रिकेशन ग्रुपचे प्रमुख हाजी युसुफ पठाण यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यांच्यासह प्रमिला गोरे, अनिता हरवणे, किरण बैरागी, सतिष कासार, दिपक थोरात या उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांना राष्ट्र निर्माणाचे शिल्पकार हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. प्रमिला गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक प्रकल्प प्रमुख मोहमद वसीम यांनी तर सुत्रसंचालन दिपक भुकन यांनी केले. डॉ. मयूर लांडे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे