महाराष्ट्र

शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी भालेराव यांची बदलीबाबत  शिवसेना  आक्रमक

शेवगाव - प्रतिनिधी

शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी भालेराव यांचीनुकतीच  बदली केली असल्यामुळे, सदर बदली रद्द करावी  म्हणून शिवसेनेने  निषेध  नोंदविला असून तसें निवेदन तहसीलदार  संबंधित  अधिकारी  यांना दिले आहे
        शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मिळालेला एकमेव अधिकारी भालेराव  हे असून त्यांचीही  राजकीय दबावापोटी चार महिन्यातच बदली केली गेली यावर  शेवगावकरांनी विचार करावा व येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापित त्यांच्या मागे न उभे राहता सर्वसामान्य जनतेच्या सोबत असणाऱ्या बरोबर राहणं हे शेवगावकरांसाठी गरजेचा आहे. असे प्रतिपादन शिवाजीराव  काटे उप जिल्हाप्रमुख शिवसेना  केले आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून  कार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली घडवणाऱ्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्च्यांना येत्या काळामध्ये शेवगावकर नगर परिषदेमध्ये तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. तात्काळ भालेराव साहेबांची बदली थांबून पुन्हा शेवगाव नगर परिषद मध्ये चार्ज देण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.
शेवगाव शहर हे वर्षानुवर्षे भौतिक सुविधेच्या अभावामुळे त्रासले आहे. शहरात पूर्वीचे सत्ताधारी व आताच सत्ताधारी कोणीही शहर विकासासाठी काम करत नव्हते. अश्या वेळेस चार महिन्यापूर्वी आलेला एक अधिकारी जो लोकहिताची कामे करत होता. कामाचा वेग शहरात लोकांना दिसत होता.  त्याची अचानक बदली हि शेवगावकर म्हणून चिंताजनक आहे असे शिवसेना शहरप्रमुख ॲड सिद्धार्थ काटे यांनी सांगितले.
 त्यामुळे हि बदली तातडीने थांबवावी अशी मागणी शेवगाव शहर व तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी करत आहे.   भालेराव  यांची  बदली रद्द करण्यासाठी जे निवेदन देण्यात आले  त्यावर   उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव काटे, तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, शिवसेनेचे  शहरप्रमुख ॲड सिद्धार्थ काटे, युवासेनेचे तालुकाप्रमुख शितल पुरनाळे, उपशहरप्रमुख कानिफ कर्डिले , उपतालुका प्रमुख पांडुरंग नाबदे, तालुका प्रसिद्ध प्रमुख उदयशेठ गांगुर्डे शाखाप्रमुख अशोक गवते किरण मगर दादासाहेब काकडे किसन डाके अरुण काळे सर, माऊली धनवडे, निखिल गायकवाड आदींच्या सह्या आहेत
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे