महाराष्ट्र

लोकनेते मारुतरावजी   घुले पाटील यांना ‘जिजामाता विद्यालयात’अभिवादन

शेवगाव / प्रतिनिधी

   नेवासा -शेवगाव तालुक्यातील ग्रामविकासाचे शिल्पकार  लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी ता.शेवगाव येथे स्व.लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रतिमेस पुष्पहारअर्पण केला , यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब काटे म्हणाले कि,  सहकाराच्या माध्यमातून कृषी-ओद्योगिक क्रांती घडविण्यात लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे योगदान मोठे आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची स्थापना व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून त्यांनी आर्थिक क्रांती केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, उपेक्षित, वंचित या घटकांना उन्नतीचा एक नवा मार्ग उपलबध करून दिला. त्यांची समाज व सहकाराप्रतीची निष्ठा सर्वांनाच भावली, रुबाबदार व्यक्तिमत्व, शब्दातील वजन, व करारी दृष्टी यामुळे पाहता क्षणी त्यांची छाप पडत असे. पुरोगामी विचाराची सांगड़, समाजाप्रती बांधलकी, सामान्यांना कसा न्याय द्यावा,सहकारी संस्था काटकसरीने कशा चालवाव्यात व सर्वसामान्यांचे हिताचे निर्णय कसे राबवावेत याचे अनोखे कसब त्यांच्याकडे होते म्हणून तात्कालीन तरुणांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले.

 

सामाजिक व सहकारी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले, त्यांना बळ दिले. मोठे केले. राजकारण दूर ठेवून संस्था जपल्या, वाढविल्या, कार्यकत्यांच्या सुख दुःखात सहभागी झाले. सामान्यमाणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. महाराष्ट्र घडविण्यासाठी तन-मन-धन अपर्ण केले. म्हणूनच आजही त्यांच्या स्मृती चिरंतन व प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यानंतर सहकारी चळवळीतून ग्रामीण भागातील जनजीवनाला प्रगतीचा नवा मार्ग दाखविण्याचे महान कार्य महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी केले त्यात लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या कार्याची नोंद महाराष्ट्राच्या प्रगतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहली आहे.यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक कैलास भारस्कर,उपशिक्षक अमोल लोखंडे, आबासाहेब वाघमारे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यालयातील शालेय अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते  स्पर्धेत भाग घेऊन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला या वेळी विद्यालयातील उपशिक्षक रावसाहेब घनवट, श्रीमती माया मुळे,बाळासाहेब उगले,जगदीश आरेकर,अशोक खंडागळे,रघुनाथ पटारे याच्यासह विद्यालयातील विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर उगले यांनी केले तर आभार प्रकाश उगलमुगले यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे