महाराष्ट्र

शिक्षक बँकेत सदिच्छा आघाडी सत्तेवर आल्यानंतर दोन्ही गुरुमाऊली मंडळाची घोटाळ्याची मालिका बाहेर काढून फौजदारी गुन्हे दाखल करू – श्री. रघुनाथ झावरे सर

अहमदनगर - प्रतिनिधी

 पाच सहा वर्षे सत्तेत असणाऱ्या दोन्ही गुरू माऊली मंडळाने प्राथमिक शिक्षक बँकेत घोटाळ्याची मालिका उभी केली आहे व सर्वसामान्य सभासदांच्या पैशावर डल्ला मारून नेत्यांसह संचालक बोर्ड चैन करत आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्याच्या मालिकेमध्ये शताब्दी घोटाळा, घड्याळ खरेदी घोटाळा, पुरस्कार घोटाळा ,राहुरी शाखेतील पाच लाख चोरी घोटाळा, कर्मचारी घोटाळा, गार्ड/ सुरक्षा घोटाळा, फरक घोटाळा, कर्मचारी बदल्या घोटाळा, सात हजार रुपये घोटाळा, परस्पर रक्कम वर्ग घोटाळा, कोरोना काळातील संचालकांचा प्रवास भत्ता घोटाळा, कोरोना काळातील चहापान व फोन बिल घोटाळा, रंगरंगोटी दुरुस्ती व इलेक्ट्रिक रिपेरिंग घोटाळा, विकास मंडळ बांधकाम घोटाळा ,संचालक, कर्मचारी सभासद प्रशिक्षण घोटाळा, वार्षिक सभा घोटाळा, तीन तीन महिन्याला चेअरमन बदल घोटाळा व अहवालात इतर खर्च या गोंडस नावाखाली केलेला कोट्यावधी रुपयाचा घोटाळा इ.या संपूर्ण घोटाळ्याची मालिका व भ्रष्टाचार सदिच्छा बहुजन शिक्षक संघ व साजिर महिला आघाडी येत्या बँक निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी दोन्ही गुरुमाऊलीचे नेते व संचालक बोर्ड यांची बँकेत केलेल्या भ्रष्टाचार ,घोटाळ्याची मालिका शिक्षक सभासदांसमोर आणून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सामान्य सभासदांचा पैसा वसूल करून सभासदांना मिळवून देणार.कारण दोन्ही गुरुमाऊली मंडळांनी गळ्यात गळे घालून सर्वसामान्य सभासदांच्या पैशावर फार मोठा डल्ला मारून विश्वासघात केलेला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासद मत पेटीतून सत्ताधारी घोटाळेबाज, लबाड व धूर्त व भ्रष्ट दोन्ही गुरुमाऊली मंडळांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तरी दोन्ही गुरुमाऊलींनी केलेल्या घोटाळ्याचे जाब विचारण्यासाठी व बँकेच्या सर्वसाधारण सभेत ध्येय धोरण मांडण्यासाठी आघाडीच्या सर्व शिलेदारांनी शनिवार दिनांक 17 /9/ 2022 रोजी शेतकरी भवन मार्केट यार्ड अहमदनगर येथे दुपारी चार वाजता आघाडीच्या पार्टी मीटिंग साठी व रविवार दिनांक 18 /9 /2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी /वार्षिक सभे साठी सुखकर्ता मंगल कार्यालय बायपास रोड अहमदनगर येथे उपस्थित रहावे असे संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, पदवीधर जिल्हा अध्यक्ष व आघाडीचे पारनेर तालुका शिक्षक बँकेचे उमेदवार रघुनाथ झावरे, सदिच्छा मंडळाचे पारनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत मोढवे, शिक्षक नेते व आघाडीचे विकास मंडळाचे उमेदवार विजय काकडे साजिर महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनल शेळके शिक्षक नेते बाळासाहेब खिलारी, गोवर्धन ठुबे ,पारनेर तालुका संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, बहुजन शिक्षक नेते शिवाजी पठारे, अंबादास काकडे, संघाचे राज्य प्रतिनिधी विशाल खरमाळे, मधुकर शिंदे, शिवाजी झावरे, प्रकाश केदारी, लहू थोरात, राजेंद्र खोडदे, दादाभाऊ कोल्हे, आलका आगवान, स्वाती कोल्हे, सविता तांबे, राजू खोडदे, बाळासाहेब रोहकले, अण्णासाहेब चौरे, डी आर ठुबे, दादा वाघ, प्रभाकर मंचरे, शिवाजी ठोकळ, सोन्याबापु भांड ,शांताराम खामकर ,रावसाहेब वाळुंज, पोपटराव कदम, अशोक वाळुंज, उषा बांडे, सविता भालेकर, मीना गायकवाड, प्रियंका नरसाळे, सुनीता नरवडे, सविता जाधव, मीनाक्षी वाळुंज, सुजाता बर्वे, नितीन चेमटे, दादाभाऊ बेलोटे, जेता जाधव ,संजय सिनारे ,रमेश रोहकले, बाळासाहेब ठाणगे, पांडुरंग शिरोळे ,भाऊसाहेब ढोकळे, बाबाजी ढोकळे, विठ्ठल नाबगे, बाबासाहेब भांड, राजेश चौरे, नानासाहेब झावरे, मारुती अनंत,संभाजी एरंडे ,बाळासाहेब सोनवणे, चंद्रकांत गोसावी, गणेश कोहकडी, मंजुळा शिंदे अलका भनगडे, बिंद कुमार नरड, बाळासाहेब थोपटे, बाळासाहेब पुजारी, हरिभाऊ जराड ,रवींद्र गुंजाळ, लक्ष्मण आग्रे, दुंदा बांडे, लहानु झावरे, प्रवीण मेंगाळ ,सतीश चव्हाण, नवनाथ गागरे, मालोजी मंचरे, संदीप बोरुडे, किसन धरम, रामदास शिंदे, रघुनाथ वाळुंज, अशोक गागरे, राजू खरमाळे ,भाऊसाहेब गुंजाळ, बन्सी वाळुंज, बापूसाहेब रोहकले, स्वाती कोल्हे इत्यादी आघाडीच्या शिलेदारांनी शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे