महाराष्ट्र

कोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..

अजय नजन प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील कोटा एक्सलंन्स सेंटर येथील विद्यार्थी श्रेयश श्रीकांत बोबडे याने नीट परिक्षेत ५९२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे तसेच गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे गणेश आदिनाथ वाघमोडे ५०४ श्रीनाथ श्रीकांत बोबडे ३४२ तसेच जेईई परिक्षेत खरात आदित्य विश्वनाथ ८३.१२% चव्हाण योगेश विठ्ठल ७३.४% व सीईटी परीक्षेत श्वेतांक कल्याण राऊत ९७% प्रणित बबन घुगे ९५% वैष्णवी एकनाथ जगताप ८८.१५% श्रेयश श्रीधर भागवत ८७.८४% संकेत संदिप घनवट ८६.१% समृद्धी अनिल गोर्डे ८३.४७% निलेश बापू ढोले ८१.२% या विद्यार्थ्यांचा कोटा एक्सलंन्स सेंटर शेवगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेवगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट या प्रमुख उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमासाठी आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे विश्वस्त पृथ्वीसिंग (भैय्या) काकडे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण बिटाळ प्राचार्य संजय चेमटे प्रा.हरिष खरड प्रा.राजेश दारकुंडे शिव अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट बोलताना म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर काय असतं हे समजून घेण्यासाठी फार वेळ जातो तसेच आपण निवडलेल्या करिअर संदर्भात आवश्यक गोष्टी समजून घेणे फार महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आयुष्यात दैनंदिन जीवनात ध्यानधारणा तसेच योगा या गोष्टी नियमितपणे केल्यास मनाची स्थिती ही स्थिर राहते त्यामुळे अभ्यासात मन लागते पालकांनी या स्पर्धात्मक जीवनात आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल हा चांगल्या कामासाठी आणि ज्ञानासाठी वापरावा अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान देखील होत आहे विद्यार्थी आपल्या अमूल्य वेळातून दोन ते तीन तास वेळ असंच घालवतो त्यामुळे मोबाईलचा वापर हा मर्यादित असावा इयत्ता आठवी ते बारावी या वयात विद्यार्थ्यांचे मन हे खूप तेज असतं या वयात ज्या दिशा तुमच्या मनाला तुम्ही दाखवाल तेच तुमच्या आयुष्यात घडत असतं शेवगाव सारख्या ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी कोटा एक्सलंन्स सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला अगदी चांगली संधी मिळाली आहे त्या संधीचा फायदा घेऊन आज जे विद्यार्थी यशस्वी झाले आहे या विद्यार्थ्यांप्रमाणे पुढील वर्षी अनेक विद्यार्थी यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करते दहा बारा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात इतक्या सुविधा उपलब्ध नव्हत्या परंतु आज सर्व सुविधा उपलब्ध आहे ही अगदी आनंदाची गोष्ट आहे.संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ बोलताना म्हणाले आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष ॲड.डॉ शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो व चार-पाच वर्षात ही मुलं तयारी करून यशस्वी होतात जोपर्यंत विद्यार्थी पालक शिक्षक हे तीनही घटक एकत्र येऊन त्या मुलांना मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत अपेक्षित यश मिळत नाही आपल्या कोटा एक्सलन्स सेंटर शेवगाव मधील जे जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांनी अगदी चौदा ते पंधरा तास अभ्यास केलेला आहे कोटा एक्सलन्स सेंटर मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हा निर्णय अतिशय योग्य आहे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय अलीकडच्या काळामध्ये घेतलेला आहे त्यामुळे मेडिकल क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी भविष्यात उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲकडमीक डायरेक्टर शिव अग्रवाल यांनी केले तर सुत्रसंचलन समता नेव्हल यांनी केले तसेच आभार प्राचार्य संजय चेमटे यांनी मानले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे