ब्रेकिंग

वाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..

अजय नजन प्रतिनिधी

वाघोली येथे दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही वाघेश्वरी माता नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. यानिमत्ताने येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये स्री जन्माच्या स्वागताचा उत्कृष्ट कार्यक्रम नुकताच पार पडला.
स्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक , नेत्रतज्ञ डॉ सुधा कांकरिया यांनी वाघोली गावातील नवरात्र उत्सवात सहभागी होऊन ग्रामस्थ व माता भगिनींना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांच्या शुभहस्ते देवीची आरती करण्यात आली. या प्रसंगी बोलताना
स्री म्हणजे आदी शक्तीचे दुसरे रूप. त्यामुळे स्री जन्माचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. बेटी नहि तो बहु कहासे लाओगे. स्री भ्रूणहत्या होणार नाही आणि होऊ देणार नाही. स्री जन्माचे मनापासून स्वागत करा. कन्या जन्म आनंद सोहळा. एक रुपयाची जादू योजना. नाकोशीला करूया हवीशी. लग्न प्रसंगी सात फेऱ्याबरोबर “.लेका एवढीच लेक ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्री जन्माचे स्वागत करूया ” असा आठवा फेरा घेऊया. असा उपक्रमाची माहिती देऊन या संदर्भात ग्रामपंचायत वाघोली यांच्या माध्यमातून ठराव मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी स्री जन्माच्या स्वागताची शपथ घेण्यात आली.
वाघोली गावातील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे सोमेश्वर शेळके यांची बहीण व अंजली भिवसेन शेळके यांची मुलगी शारदा च्या लग्नात स्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेरा पूर्ण केल्याबद्दल डॉ सुधा ताईंच्या तर्फे यांचा सन्मान करण्यात आला.
एकाच मुली वर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल मोहन मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
वाघोली गावात चालू असलेल्या विकास कामाची प्रशंसा करत सरपंच बाबासाहेब गाडगे, ग्रामसेविका जनाबाई फटाले, युवा नेते उमेश भालसिंग यांचा सन्मान करण्यात आला.
वाघोली गावाला माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांक 1.5 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ सुधा कांकरिया यांनी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच वाघोली ग्रामस्थांचे कौतुक केले व अभिनंदन केले.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब गाडगे, ह भ प भाऊसाहेब महाराज भालसिंग , युवा सामाजिक कार्यकर्ते उमेश भालसिंग, ग्रामसेविका जनाबाई फाटले, बापू भालसिंग, रावसाहेब शिंगटे, रमेश भालसिंग, राजेंद्र जमधदे,दादासाहेब जगदाळे, अशोक शिंदे, भाऊराव भालसिंग,आबासाहेब ब्राम्हने, किशोर शेळके, आप्पासाहेब भालसिंग, बापू चीतळकर, पांडुरंग भालसिंग, योगेश भालसिंग, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माता भगिनी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा भालसिंग, अध्यक्षीय सूचना अंजली शेळके, आभार प्रदर्शन उमेश भालसिंग यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे