प्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –
नेवासा/ प्रतिनिधी :-

अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणात आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे बँकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या मंडळांनी दिव्यांग शिक्षकांना कायम डावलले आहे..बँकेची शताब्दी पूर्ण झाली तरीही दिव्यांग शिक्षकांना उमेदवारीत पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही यामुळे दिव्यांग कर्मचारी संघटनेने काल दि.09/10/2022 रोजी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन वेळा मीटिंग घेतली मीटिंगमध्ये असे ठरले की जे मंडळ बँकेमध्ये दिव्यांग बांधवांना स्वीकृत संचालक म्हणून पुरेसे प्रतिनिधित्व देईल त्या मंडळाला संपूर्ण पाठिंबा देणार हे एकमताने जाहीर केले आहे.अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 387 दिव्यांग शिक्षक कार्यरत आहेत तरीही जाणीवपूर्वक त्यांना उमेदवारीत टाळले जाते.
त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य सहकोशाध्यक्ष श्री संतोष सरवदे यांनी सांगितले आहे.
यावेळी निवडणुकीची परिस्थिती पाहता 4 पॅनल रिंगणात असल्यामुळे चार ही पॅनल कडे निवडणुकीत निवडून येण्या इतपत कोठा दिसत नाही, त्यामुळेच निवडणूकीत ही लढत अत्यंत अटीतटीची होणार आहे.त्यामुळे दिव्यांग कर्मचारी ज्या मंडळाला पाठिंबा देतील ते विजयाच्या जवळ पोहोचणार हे नक्की आहे.सर्व दिव्यांग बांधवांना एकत्रित ठेवून एकमताने हा पाठिंबा दिला जाणार आहे.दिव्यांग कर्मचारी संघटनेचेच्या एकजुटीमुळे आता शिक्षक बॅकेच्या निवडणूकीत समिकरणे बदलणार असून विविध पॅनलचे नेते दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर चर्चा करुन मन वळविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत काल झालेल्या सभेसाठी जिल्हा सचिव श्री पोपट धामणे सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजू आव्हाड ,श्री अनिल ओहळ, श्री नासिर सय्यद,श्री उद्धव थोरात ,श्री रमेश सुपेकर,श्री जयकिसन वाघ पाटील,वडीतके,श्री बालाजी चव्हाण,श्री सुनील जाधव,श्री बळीराम जाधव,श्री सुभाष फसले,श्रीम रोहिणी लगड, श्रीम राजाबाई कांबळे ,श्रीम जपकर मॅडम, श्रीम सुमन अलमले हे सर्व उपस्थित होते.