
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड शेवगाव तालुका आयोजित शिवअभिषेक सोहळ्यास शेवगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड शेवगाव तालुका सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
तसेच दिपावली पाडवा निमित्ताने कै.भास्करराव नानासाहेब देशमुख कै.सचिन ज्ञानेश्वर देशमुख कै.रामचंद्र साहेबराव (तात्या) सातपुते कै.भाऊसाहेब देशमुख (गुरुजी) कै.शंकरराव रणजीतराव लांडे, कै.कांताभाऊ जनार्दन फडके, कै.डॉ आबासाहेब सातपुते यांच्या स्मरणार्थ गोरगरीब कुटुंबीयांना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि.२६ रोजी सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक शेवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धअभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसेच मोफत किराणा किटचे वाटप पंचायत समिती शेवगाव श्री दत्त मंदिर प्रांगणात होईल अशी माहिती मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.