देश-विदेश

कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे, द लॅन्सेटचा दावा..!!

नवी दिल्ली

कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे, द लॅन्सेटचा दावा..!!

कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुराव्यातून सिद्ध झाल्याचे संशोधन द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, कोरोना हवेतून पसरतात आहे आणि त्याचे पुरावे सातत्याने संशोधकांना मिळत आहेत. कोरोना हवेतून पसरतात असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ना त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले नसल्याचे ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ञांनी सांगितले आहे.हवेच्या माध्यमातून कोरोणाचा प्रसार हा होतो. या दाव्यासाठी या संशोधनात दहा ओळी चे पुरावे देण्यात आले आहेत. असेही या अहवालात सांगण्यात आले आहे की,बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातील व बंदिस्त वातावरणात कोरोना चा प्रसार जास्त होत आहे. पण, घरी योग्य ती वेन्टिलेशन व्यवस्था असेल तर तो धोका कमी आहे.तसेच लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही एकूण रुग्णांपैकी 40 टक्के असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.काही वैज्ञानिकांच्या याआधीही दावा केला आहे की प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून कोरोना चा प्रसार हा होतो. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते. 32 देशांच्या 200 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहिले होते त्यामध्ये सांगितले होते की कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतो डोळ्यांना न दिसणाऱ्या कणांमुळे लोकांमध्ये कोरोना चा प्रसार होत आहे आता जागतिक आरोग्य संघटनेने आणि जगभरातल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासावर विचार करावा आणि हवेच्या माध्यमातून होण्यास कोरोना प्रसार कसा थांबवता येईल त्यावर उपाययोजना कराव्यात असे मत काही संशोधकांनी व्यक्त केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे