देश-विदेश

कोरोनाच्या धास्तीने मांसाहारावर भर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार; अंडी, चिकनच्या दरात वाढ

नेवासा:-

कोरोनाच्या धास्तीने मांसाहारावर भर
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार; अंडी, चिकनच्या दरात वाढ

राज्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटे मधील बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असल्याने नागरिक प्रोटीनयुक्त आहार घेण्याकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे वातावरणात उष्मा असला तरी मटण, अंडी, चिकन खाण्याला पसंती मिळताना दिसत आहे. परिणामी दरामध्ये ही वाढ होत आहे.

पहिल्या लाटेमध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या आहातच दररोज दोन अंडे याचा समावेश होता दुसऱ्या लाटेमध्ये मात्र, नागरिक कोरोना संसर्ग सोबत लढण्यासाठी पूर्व दक्षता म्हणून अंडी, चिकन, मटनावर ताव मारत आहेत.
देशभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी नागरिकांची रोगप्रतिकारशक्‍ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी काही जाणकारांनी या काळामध्ये आहारामध्ये कोणत्या प्रकारच्या घटकांचा समावेश असावा याबाबत माहिती दिली आहे. काही वैद्यकीय अधिकारी ही अंडी, चिकन यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे मानवी शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढून शरीर कोरोनाविषाणू चा मुकाबला करू शकणार आहे. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर कोरोना चा संसर्ग झाला तरी व्यक्ती अत्यवस्थेत पोहोचण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आहरामध्ये प्रोटीन युक्त पदार्थांचा वापर वाढला आहे. परिणामी उन्हाळ्यातही चिकन-मटण- अंडी याची मागणी वाढत आहे.
कोरोना पहिल्या लाटेमध्ये कोरोनाविषाणू चिकन मधून पसरत असल्याचा गैरसमज झाला होता. परिणामी चिकन व अंड्याचे दर झपाट्याने घसरले होते. त्यावेळी कोंबड्यांच्या खाद्याचा दर परवडत नसल्याने अनेक पोल्ट्रीधारकांनी मोफत कोंबड्या हि वाटप केल्या होत्या. अंड्याची हीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही कालावधीनंतर गैरसमज दूर झाल्यानंतर चिकनला पुन्हा चांगले दिवस आले.

□मागणी मुळे दरात वाढ
सध्या चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने दर २०० ते २५० प्रतिकिलो वर पोहोचला आहे. दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अंडी पाच रुपयांवरून सहा रुपये प्रति नग विक्री होत आहेत. चिकनला मागणी वाढल्याने मटणाचा दर स्थिर राहिला असून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत विकले जात आहे. कोरोना पासून बचावासाठी चिकन व अंडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे