आपला जिल्हाब्रेकिंग

शेवगावच्या डेशिंग तहसिलदारांच्या गाडीला अपघात, वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात.

अहमदनगर news18marathi

शेवगाव तालुक्याच्या डेशिंग तहसिलदार सौ. अर्चना भाकड-पागिरे यांच्या वाहनाला अपघात होऊन त्या जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवार (ता. 19 रोजी) दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान वाहनावरील ताबा सुटल्याने माका येथील खार्‍याचा ओढा या ठिकाणी घडला आहे.

तहसीलदार पागिरे सोमवारी आपल्या खासगी वाहनाने शेवगाव येथे जात असतांना माका ते निंबेनांदूर रस्त्या दरम्यान असलेल्या खार्‍या ओढ्याच्या वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची कार ओढ्यात जावून अपघात झाला. यावेळेस तहसीलदार मॅडम स्वतः गाडी चालवीत होत्या.

वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याने तहसिलदार किरकोळ जखमी झाल्या आहेत. उपस्थित नागरिकांनी पागिरे यांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

——————————————————- ————————-
तालुक्यातील सर्व नागरिकांच्या शुभेच्छा सोबत असल्याने भीषण अपघात होऊनही मला काहीही झालेले नसून माझी प्रकृती उत्तम असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी सांगितले
———––———————————————————————–

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे