देश-विदेशब्रेकिंग

‘या’ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच सरसकट लस ; मोदी सरकारचा निर्णय

दिल्ली news18marathi

 देशामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. महाराष्ट्रामध्ये तर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे वयाची अट न ठेवता लसीकरण करावे अशी मागणी सर्वच स्तरावरून होत होती. आता याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस घेता येणार आहे.


येत्या १ मेपासून नागरिकांना करोनावरील ही लस घेता येईल, एएनआयने हे वृत्त दिलं आहे. लसीकरण मोहिमेला संपूर्णपणे वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या टप्प्यामध्ये लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या ५० टक्के लस केंद्राला पुरवतील आणि उर्वरीत ५० टक्के डोस हे राज्य सरकार किंवा खुल्या बाजारात विकण्यास स्वतंत्र असतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे