आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

संकट असले गंभीर, नका सोडू धीर.. आम्ही आहोत खंबीर…

कृषी उत्पन्न बाजार समिती लगतच्या लोकनेते मारूतरावजी घुले पाटील मंगल कार्यालयात होणार कॉविड केअर सेंटर

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील दररोज कोरोना बाधित रुग्णाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या प्रयत्नांतून शेवगाव येथे १०० बेडसचे सर्व सोयीयुक्त सुसज्ज  “कोविड केअर सेंटर” लवकरच रुग्णांच्या सेवेकरीता सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती सोशल मीडियावर पंचायत समिती सभापती डॉ क्षितीज घुले पाटील यांनी दिली आहे.

  शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत लोकनेते मारूतरावजी घुले पाटील मंगल कार्यालय असून सदर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील  यांनी सोमवार तारीख 19 रोजी प्रत्यक्षस्थळी जाऊन तेथील सोयी-सुविधांच्या तयारीचा आढावा घेतला. तालुक्यातील बोधेगाव नंतर शेवगाव शहरात हे कोविड सेंटर होत असून वेळप्रसंगी यात बेडची संख्या वाढवली जाईल असेही यावेळेस सांगण्यात आले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे