आरोग्य व शिक्षण

घरातील या पदार्थाची वाफ घ्या, ऑक्सीजन कमी होणारच नाही,

फुफ्फुसे स्वच्छ व निरोगी, छातीतील कफ जळेल…

नमस्कार मित्रांनो, news18marathi.in मध्ये आपले स्वागत आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी असते परंतु अचानक बदलते वातावरण आणि खाण्या पिण्यात झालेला बदल, वायरल इन्फेक्शन, संक्रमण इत्यादी कारणामुळे सर्वप्रथम ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना त्यांचा प्रथम घसा खवखवतो, आवाज बदलतो, वेळीच लक्ष न दिल्यास पुढे सर्दी होते.

अजूनही अंगावर काढल्यास छातीत कफ होतो. हा छातीतील कप लवकर कमी न झाल्यास फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. वारंवार खोकला येतो, ताप येतो. मित्रांनो शरीरास आवश्यक असणारा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे प्रतिकारशक्ती खालावते. निमोनिया यासारखे आजार होतात.
सध्याच्या या भीतीयुक्त वातावरणामध्ये कोणतेच दुखणे अंगावर काढू नका. लगेच दवाखान्यात दाखवा. याच दिवसात योग्य तो घरचा आहार घ्या. व्यायाम व योगासने करा. तसेच काही घरगुती उपायांचा वापर करा. ज्याने तुमची प्रतिकारशक्ती आणि तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल नेहमी शंभर टक्के राहील. अशा या घरगुती आयुर्वेदिक स्टीम थेरपीसाठी कोणते पदार्थ लागणार आहेत ते सांगणार आहोत.

मित्रांनो छातीतील असणारा चिवट कफ जाण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना दवाखान्यात वाफ दिली जाते. अशाच प्रकारे ही आयुर्वेदिक स्टीम थेरपी घरच्या घरी कशी करायची हे आज सांगणार आहोत.

यासाठी सर्वप्रथम लागणारा पदार्थ म्हणजे “गवती चहा”. गवती चहा उष्ण आहे. गवती चहा मध्ये असणारे अंटीबॅक्टरियल घटक शरीरातील कफ मोकळा होण्यास मदत करतात.तसेच याचा सुगंधी वास डोकेदुखी व सर्दी कमी होण्यास उपयुक्त ठरतो. म्हणून या गवती चहाची पाने तोडून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत.

यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या दारामध्ये उपलब्ध असणारी “तुळस”. दिवसभराचा थकवा दूर करणारे घटक तुळशीमध्ये असतात. तुळशी मध्ये मोठ्या प्रमाणात अंटीबॅक्टरियल गुण असतात. जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात तसेच तुळशीच्या वासाने फ्ल्यू चा धोका कमी होतो. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण प्रचंड वाढते. म्हणून की तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घरी आणा. आणल्यानंतर सर्व पाने वेगळी करायची आहेत.

यानंतर तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे “ओवा”. ओवा शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच शरीरामध्ये असणारे विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरतो. छातीमध्ये असणारा कसल्याही प्रकारचा कफ, खोकला तसेच वारंवार होणारी सर्दी यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो. ओव्याचा नुसता वास घेतला तरी नाक मोकळे होते. अशा या ओव्यांमध्ये थायमोलचा गंध, थायमिन, निकोटिनिक ऍसिड, फॉस्फरस, लोह इत्यादी घटक शरीरातील हानिकारक तत्त्वे बाहेर काढण्यास मदत करतात. म्हणून ज्यांना सर्दी, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, श्वासासंबंधित तक्रारी कमी करायच्या असतील त्यांच्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणून छोटा चमचा ओवा जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करून घ्या. एका पातेल्यात गॅस वरती ठेवा. या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या. या एक ग्लास पाण्यामध्ये तुळशीची पाने व्यवस्थित कुसकरून सोबतच गवती चहा बारीक बारीक तुकडे करून यामध्ये टाका. यासोबतच बारीक केलेला ओवा देखील त्यामध्ये टाका. सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत उकळा. एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण आपल्या समोर घ्या. त्यांनतर एक कपडा अंगावर घेऊन वाफ घ्या.यामुळे सर्दी निघून जाईल व घसा मोकळा होईल. सोबतच डोकेदुखी व सायनस कमी होईल. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल.तसेच संक्रमण कमी होईल. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल १०० राहण्यास मदत होईल. असा हा अत्यंत महत्वपूर्ण उपाय Share करून इतरांना देखील सांगा.
धन्यवाद!!!!!!!! (COUNTERNEWZ.COM shoshal midia द्वारे जनहितार्थ प्रसारित)

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे