आरोग्य व शिक्षण

शैक्षणिक वर्ष संपल्याचे अखेर जाहीर शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश – तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांची माहिती

अहमदनगर news18marathi

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १३ जून तर विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत सुट्टी जाहीर केल्याचे आदेश आज शिक्षण संचालकांनी काढले असून शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
         ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाला पूर्ण विराम देत शैक्षणिक वर्ष संपल्याचे जाहीर करून १ मे पासून शाळांना सुट्टी देण्याची मागणी मुंबई शिक्षक परिषदेच्या वतीने अध्यक्ष उल्हास वदोडकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती अशी माहिती शेवगाव शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे.
        कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी एप्रिल पासून शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले होते तर अनेक शिक्षकांना कोरोनाच्या कामासाठी शासनाने जुंपले होते त्यामुळे मे महिन्याची सुट्टी शिक्षकांना मिळाली नव्हती. शिक्षकांनी एप्रिल महिन्यापासून सतत १३ महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविले. ऑनलाईनचा कोणताही अनुभव नसतांना झूम, गुगल मिट तसेच इतर प्लॅटफॉर्मचा वापर करीत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन ऑफलाईन शिक्षण दिले.विविध प्रशिक्षणे घेतली.सतत डेस्कटॉप,लॅपटॉप व मोबाईलवर काम केल्यामुळे अनेक शिक्षकांना दृष्टीदोषाच्या आजाराने ग्रासले आहे. विद्यार्थीदेखील आता ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले होते. सध्या शिक्षक निकालाचे कामे करीत असून १ मे पर्यंत बहुतेक शाळांचे काम पूर्ण होणार असल्याने १ मे ते १३ जून पर्यंत ऑनलाईन शिक्षणाला पूर्णविराम देत शाळांना सुट्टी घोषित करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने केली होती तसे शासनाचे अधिकृत पत्र निघाले आहे अशी माहिती शेवगाव शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारने वरील मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार केल्याने शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते, नाशिक विभाग अध्यक्ष सुनिल पंडित, जिल्हाध्यक्ष सखाराम गारुडकर, शरद दळवी जिल्हा सचिव चंद्रकांत चौगुले, तुकाराम चिक्षे, किशोर दळवी, अनिल आचार्य, अरविंद आचार्य, शशिकांत थोरात, विनायक कचरे, सतिश जगदाळे, बाबासाहेब बोडखे, सत्यवान थोरे, प्रदिप बोरुडे, हरिभाऊ कोथिंबीरे, सुधीर बढे, नितीन मालानी, प्रदीप पांडव, किरण शेळके, संदिप झाडे, कारभारी लोणारी, राहुल ज्योतिक, रविंद्र पवार, बाळासाहेब घावटे, अमृत गोरे, देवीप्रसाद जोशी, ज्ञानदेव वंजारी, अनिल दरंदले, निलेश मोरे, कन्हैया भंडारी, अनिल ससाणे, शहाजहान शेख, सचिन शिरसाठ आदी पदधिकार्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे