ब्रेकिंग

शेवगाव शहरामध्ये व तालुक्यामध्ये सात दिवसाचा जनता कर्फ्यू -मा.तहसीलदार यांची घोषणा

शेवगाव - लक्ष्मण मडके

शेवगाव शहर व व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेवगावमध्ये सात दिवसाचा कडक जनता कर्फ्यू केला असल्याची घोषणा मा. तहसीलदार अर्चना भाकड -पागिरे यांनी केली आहे.
             याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव शहर तालुक्यातील नागरिकांना कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली व त्यानुसार दिनांक ११ मे ते १७ मे पर्यंत सात दिवसाचा जनता कर्फ्यू हा जाहीर केला असल्याची माहिती शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी दिली आहे. यादरम्यान फक्त दवाखाने, सर्व मेडिकल दुकाने हे चालू राहतील. तसेच दूध संकलन केंद्र सकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे.पेट्रोल व डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू राहतील.तसेच भाजीपाला, फळे किराणा माल विक्री व इतर सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद राहतील.त्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहरातील नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड – पागिरे यांनी दिली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे