आपला जिल्हा

स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना लसीकरण होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे गोंधळ..

अहमदनगर - लक्ष्मण मडके

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, जो तो या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणाचा प्रयत्न करीत आहे. कोरोना लसीकरणासाठी आँनलाईन नोंदणीमुळे तालुक्यातील नागरीकांना बाहेरच्या जिल्हयातुन आलेल्या नागरींकामुळे लस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी आज शेवगाव येथील ग्रामिण रुग्णालयात होणारे लसीकरण ३ ते ४ तास बंद पाडले. त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रथम स्थानिक नागरीकांना लस दया मगच बाहेरुन आलेल्या इतर नागरीकांना लस दयावी असे म्हणत रुग्णालयाच्या दारातच ठिय्या दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
              १८ ते ४५ वयोगटातील नागरीकांची आंनलाईन नोंदणी करुन ठरवुन दिलेल्या केंद्रावर लसीकरणासाठी वेळ दिली जाते. आँनलाईन नोंदणी झाली तरच लस मिळत असल्याने नागरीकांची धावपळ वाचली आहे. मात्र आँनलाईन प्रक्रियेमुळे केंद्रावरील लसीचा डोस मिळण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिक शेवगाव येथे लसीकरण करीत असलेबाबत लक्षात आले आहे. बीड, जालना, औरंगाबाद येथील नागरिकांना शेवगाव तालुक्यातील अनेक लसीकरण केंद्रे जवळ वाटत असल्यामुळे सदर नागरिक हे शेवगाव तालुका लसीकरण करण्यासाठी निवडत आहे.
 
               तालुक्यात लसीकरणाच्या तीन्ही टप्यात स्थानिकांऐवजी बाहेरच्याच व्यक्तींना लस मिळत असल्याचे निदर्शनास आल्यावर शहरातील युवक, सर्व पक्षिय कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी आज सोमवार ता.१० रोजी ग्रामिण रुग्णालयात २०० डोस उपलब्ध झाल्याने सुरु करण्यात येणारे लसीकरण बंद पाडले. यावेळी पंचायत समितीचे सभापती डाँ. क्षितीज घुले, भाकपचे संजय नांगरे, भाजपचे सुनिल रासने, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, नगरसेवक कमलेश गांधी, स्वाभिमानीचे दत्तात्रय फुंदे, कुलदीप फडके, तुषार लांडे, तुषार पुरनाळे, कमलेश लांडगे, संतोष जाधव, कृष्णा सातपुते,  किरण पुरनाळे, विष्णू घनवट, उदय शिंदे, राहुल सावंत, अजय मगर, निखील खेडकर, अमर जाधव आदींनी रुग्णालयाच्या दारातच ठिय्या मांडून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
                 
             यावेळी तहसिलदार अर्चनाभाकड-पागिरे, ग्रामिण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक रामेश्वर काटे यांनी लसीकरण प्रक्रियेची नोंदणी राज्यस्तरावरुन होत असल्याने स्थानिक प्रशासनास हस्तक्षेप करता येत नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र याबाबत येत असलेल्या अडचणी जिल्हाधिका-यां पर्यंत पोहचविण्यात येतील. त्यानंतर लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या तालुक्यातील नागरीकांना प्रथम प्राधान्याने त,  नंतर बाहेरील नागरीकांना लस देण्यात आली. मात्र यापुढे तालुक्यातीलच नागरीकांना लस देण्यात यावी. बाहेरील नागरीकांना कुठल्याही परिस्थितीत लस देवू नये अन्यथा लसीकरण बंद पाडण्याचा इशारा युवकांनी प्रशासनाला दिला.
 
फोटोओळी – बाहेरील जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांना लसीकरण न करता तालुक्यातील नागरिकांना प्राधान्याने लसीकरण मिळावे यासाठी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देतांना सर्व पक्षीय कार्यकर्ते (फोटो – लक्ष्मण मडके)


 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे