गुन्हेगारी

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे ११ वर्षीय मुलाची हत्या, गाव हादरले

शेवगाव - लक्ष्मण मडके

         शेवगाव शहरापासून ७ ते ८ कि.मी. असलेल्या खुंटेफळ येथे 11 वर्षीय मुलाची मानेवर तीष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या झाल्याची घटना (सोमवार दि १० रोजी) सायंकाळी  ५ ते ६ च्या दरम्यान उघडकीस आली. राहत्या घरातच हत्या झाल्याने गावामध्ये घबराटीचे वातावरण आहे.  घराशेजारी काम करत असतांना घरी मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या मुलाचे नाव सार्थक आंबादास शेळके (वय 11 वर्षे) असे असून याप्रकरणी मुलाचे वडील अंबादास शेळके यांची फिर्यादीवरून अज्ञात मारेकरी विरोधात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेने खुंटेफळ गावासह संपर्ण शेवगाव तालुका हादरला असून या बालकाची कोणी ? व कोणत्या कारणाने? हत्या केली, याचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलीसांसमोर उभे ठाकले आहे.
      याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथील अंबादास शेळके हे सोमवारी दुपारी आपल्या कुटुंबांसमवेत घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्यात  काम करत होते. या दरम्यान सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान आंबादास शेळके यांनी मुलगा सार्थक यास घरामध्ये असलेला मोबाईल घेऊन घेण्याचे सांगितले. सार्थक हा घरामध्ये मोबाईल आणण्यासाठी गेला. बराच वेळ झाला तरी सार्थक का आला नाही, हे पाहण्यासाठी गेले असता सार्थक याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेला दिसून आला.   सार्थक याला तातडीने गावातील संतोष काळे यांच्या मदतीने मोटारसायकल वरून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता, तेथील डॉक्टरांनी  सार्थक हा मयत झाल्याचे घोषीत केले. या घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिस ठाण्याचे पो. नि. प्रभाकर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी मयताचे वडील आंबादास दत्तू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शेवगाव  पोलीस स्टेशनला  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे