ब्रेकिंग

अगोदर महसूल विभागाच्या फाईली का अडवून ठेवल्या जातात याकडे लक्ष द्या.

अहमदनगर - लक्ष्मण मडके

कोरोना प्रादुर्भाव नियोजन करण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर बैठक घेत लसीकरणाच्या केंद्रावर गोंधळ घालणा-या नागरीकांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरली याबाबत शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी गाडीलकर यांचा निषेध व्यक्त केला असून त्यानी अगोदर महसूल विभागाच्या फाईली का अडवून ठेवल्या जातात याकडे लक्ष द्यावे अशी टिका गाडीलकर यांच्यावर केली आहे.
       जिल्ह्यात लसीकरण व्यवस्थेत मोठा गोंधळ आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगा लागत आहेत. जिल्ह्याच्या बाहेरील नागरिक लसीकरणासाठी जिल्ह्यात येत आहेत. यामुळे नगरशहरात मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी लसीकरण केंद्रात समोर ठिय्या दिला होता तर शेवगाव येथे देखील मनसे, भाजप, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी लसीकरण केंद्रात समोर घोषणा देत लसीकरण केंद्र बंद पाडले, हिच परिस्थिती पाथर्डी तालुक्यात देखील आहे. जिल्ह्यात रेमडीसिव्हर, ऑक्सिजन, बेड मिळत नाहीत. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असून याही परिस्थितीत जनतेने संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य केलेले आहे मात्र गोरक्षनाथ गाडीलकर असे वक्तव्य करून जनतेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांना बेड रेमडीसिव्हर व आक्सिजन मिळत नाहीत तेव्हा गाडीलकर कुठे होते असा प्रश्न गणेश रांधवणे यांनी उपस्थित केला. असून जनतेला धमक्या देण्यापेक्षा त्यांनी त्यांचे कर्तृत्व पार पाडावे असा सल्ला दिला आहे. जनतेला सुरळीत पणे लसीकरण तातडीने करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल मग काय गुन्हे दाखल करायचेत ते गाडीलकर यांनी करावेत, त्याच्या अशा वक्तव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना भीक घालत नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील अशा बेताल अधिका-यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री महसूल मंत्री यांचे कडे तक्रार करून गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या व नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची देखील मागणी करणार असल्याचे यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी सागितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे