गुन्हेगारीब्रेकिंग

श्रीरामपुरात दोन हातात दोन तलवारी घेवुन दहशत माजवणाऱ्या शाहरुख शेखला पोलिसांनी पकडले…

पोलिस निरीक्षक संजय सानप यांची उत्कृष्ट कामगिरी..... श्रीरामपुरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख शेखला पोलिसांनी पकडले...

         श्रीरामपूर- या घटनेची हकीकत अशी की,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की,साई नगर ,वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर येथे कच्चारोडने एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे.त्यावरून पोलीस साई नगर, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर येथे गेले असता समोरून एक इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला म्हणून पोलिस त्याच्या दिशेने गेले आसता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.त्याला पंचांसमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरुख अन्वर शेख ,वय-21 राहणार -शनी चौक ,वॉर्ड नंबर 2 ,श्रीरामपूर असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या समोर त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या दोन लोखंडी तलवारी किंमत एकूण ११००₹ असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
              ही कामगिरी श्री.पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीमती डॉक्टर दिपाली काळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री.संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी,पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे