ब्रेकिंग

अखेर खुंटेफळ येथील खुनाचा उलगडा,  शेवगाव पोलिसांना तपास लावण्यात यश

अहमदनगर - लक्ष्मण मडके

घटना –   शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत  खुंटेफळ गावामध्ये 11 वर्षीय सार्थक अंबादास शेळके याचे मानेवर तीष्ण हत्याराने वार करून त्याची राहत्या घरात हत्या झाल्याची घटना (सोमवार दि १० रोजी) सायंकाळी ५ ते ६ वा.च्या दरम्यान उघडकीस आली. घराशेजारी काम करत असतांना घरी मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी मुलाचे वडील अंबादास दत्तू शेळके यांचे तक्रारीवरून शेवगाव पो.स्टे. येथे गु.र.नं. २४६/२०२१ भा.द.वी.कलम ३०२, ४५४, ३८०, ५११ प्रमाणे दि. १०/५/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

कसा लागला गुन्ह्याचा तपास – सदर गुन्ह्यातील आरोपी अज्ञात असल्यामुळे आरोपीचा शोध घेण्याकरिता मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे आदेशाने वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला. आरोपीचा शोध चालू असतांना सदरचा खून गावातील एका अल्पवयीन मुलाने केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने, सदर विधी संघर्षित बालकास पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेऊन, पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन त्यास विचापूस केली असता, त्याने सार्थक याचा खून केल्याचे काबुल कबूल केले .

कश्यामुळे घडला गुन्हा  सदर विधी संघर्षित बालक (अल्पवयीन आरोपी) हा मयताच्या घरी चोरी करत असतांना चोरी करण्याचा हेतू उघड होऊ नये म्हणून, त्याने फिर्यादी अंबादास शेळके यांचे घरातील धारदार विळीने मयत सार्थक याचे मानेवर डावे बाजूस वार करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले.  सदर विधी संघर्षित बालकाकडे (अल्पवयीन आरोपीकडे)  चौकशी करून त्यास श्रीरामपूर येथील बालसुधार गृहात ठेऊन अधिक तपास स.पो.नि. सुजित ठाकरे हे करत आहेत. आरोपी अज्ञात असतांनाही अवघ्या चार दिवसात पोलिसांनी खुनाचा उलगडा केल्याने नागरिकांमधून शेवगाव पोलिसांचे कौतूक होत आहे.

कामगिरी – सदर कामगिरी ही मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, सुदर्शन मुंढे उपवीभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकार नगर ग्रामीण चार्ज शेवगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पो.नि. अनिल कटके, शेवगाव पो.स्टे.पो.नि. प्रभाकर पाटील, सहा. पो. नि. सुजित ठाकरे, सहा. पो. नि. विश्वास पवारा, सहा. पो. नि. मिथुन घुगे, पो.स.ई. सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे