ब्रेकिंग

नगरसेवक सागर फडके मित्र मंडळाच्या कॉविड सेंटरला आर्केस्ट्राँचे आयोजन

शेवगाव news18marathi


शेवगाव  शहरातील कोवीड सेंटरमधील कोरोना बाधीत रुग्णांचे मनोरंजन करण्यासाठी नगरसेवक सागर फडके मित्र मंडळाच्या वतीने शहरातील चार कोवीड सेंटरमध्ये रुग्णांसाठी आर्केस्ट्राँचे विनामुल्य आयोजन करण्यात आले. त्रिमुर्ती कोवीड सेंटरमधून या उपक्रमास तहसिलदार अर्चना भाकड-पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सलमा हिराणी, नगरसेवक सागर फडके, नोडल अधिकारी शैलेजा राऊळ यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी वैदयकीय अधिकारी डाँ. विदया सावंत, रोहीणी नजन, सोनाली सरोदे, अर्चना खाडे, किरण बैरागी आदी कोवीड सेंटर मधील कर्मचारी आदी उपस्थित होते. कोवीड सेंटरमधील लहान मुले रुग्ण म्हणून दाखल झाले. त्यांना रिकाम्या वेळेत आयोजीत करण्यात आलेले चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


कोरोना बाधीत रुग्ण रोगोमुळे व उपचार काळातील एकांतामुळे खचुन जात असल्याने कोवीड सेंटरमध्ये उपचार घेणा-या रुग्णांचे मानसिक आरोग्य सुधारणे आवश्यक आहे. संगीत हे माणसाच्या मनाला प्रसन्न व सकारात्मक बनवत असल्याने बाधीत रुग्णांची मानसिक स्थिती त्यामुळे सुधारण्यास मदत होते. रुग्ण कोरोनामुक्त होण्यासाठी शारिरीक स्वास्थ, सकस आहार, औषधोपचार, व्यायाम या बरोबरच मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेवगाव येथील त्रिमुर्ती, आंबेडकर भवन, स्व.मारुतराव घुले कोवीड सेंटर, स्व.गोपीनाथ मुंढे कोवीड सेंटर आदी ठिकाणी नगरसेवक सागर फडके यांच्या वतीने जितेंद्र भारस्कर यांच्या संगीत आर्केस्ट्राँचे आयोजन करण्यात आले. त्रिमुर्ती येथे त्याचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णांसाठी भारस्कर यांनी भक्ती गीते, भाव गीते, गवळणी, हिंदी मराठी चित्रपटातील गीते सादर करुन तेथील वातावरण प्रसन्न केले. यावेळी रुग्णांसह नोडल अधिकारी राऊळ व आरोग्य अधिकारी डाँ. हिराणी ठेका धरुन त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.


कै.कांताभाऊ फडके ट्रस्ट, सागर फडके मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुपच्या वतीने शेवगाव येथील सर्व शासकीय सेंटर मधील रुग्णांना दर रविवारी पोष्टीक आहार म्हणून उकडलेली अंडी, सुक्या मेव्याचे वाटप केले जाते. गेल्या दोन महिन्यापासून हा उपक्रम अविरत सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे