आपला जिल्हा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मदत करणारा अवलिया

अहमदनगर news18marathi

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका युवकाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान चक्क व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून तब्बल हजारो लोकांना मदत केली आहे. ही मदत सुवालाल शिंगावी, अमर कळमकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
या युवकाचे योगेश काकडे (रा मंगरूळ खुर्द ता शेवगाव) असे नाव असून यांने Emergency Help नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून कोरोना रुग्णांना आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना तब्बल 2 महिने मदत केली आहे. मग त्यामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करणे असे कार्य यांनी केले आहे.
हे कार्य करत असताना यामध्ये तब्बल 15 ते 20 जणांची टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यरत होती. यामध्ये शेवगाव, अहमदनगर, शिरडी, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, लातूर या ठिकाणाहून हे युवक समाजकार्य बजावत होते. या टीममार्फत हैद्राबाद, दिल्ली, गुजरात आदी ठिकाणी देखील मदत करणे शक्य झाले आहे.
योगेश काकडे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ते युवा चेतना फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. मध्यंतरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान कोरोना रुग्णांना एकप्रकारे आधार देण्याचे कार्य योगेश काकडे यांनी आणि त्यांच्या ग्रुपने केल्यामुळे महाराष्ट्रभर योगेश काकडे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
कठीण काळात युवा चेतना फाउंडेशनच्या माध्यमातून योगेश काकडे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांना याकामी उमेश आमटे, अमोल म्हस्के, रवी तांदळे, अक्षय साठे, मंगेश साळुंके, असीम सय्यद, प्रियांका बेलोटे, पांडुरंग राजगुरू, अक्षय डाके, Dr. राहुल कांडेकर, वंदना कुमावत, विदुला कुलकर्णी यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मित्रांनी मदत केली.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे