आपला जिल्हा

बोधेगाव येथील श्री स्वाधी बन्नोमाँ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप…..!

श्री स्वाधी बन्नोमाँ सामाजिक प्रतिष्ठानचे स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक....!

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील श्री स्वाधी बन्नोमाँ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ ( बाबा ) सवळकर यांच्या वतीने स्वखर्चाने तसेच प्रतिष्ठानचे सचिव शहादेव ( मामा ) गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बोधेगाव येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी श्री स्वाधी बन्नोमाँ सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ ( बाबा ) सवळकर, प्रतिष्ठानचे सचिव शहादेव मामा गुंजाळ, सहसंघटक वंचित बहुजन आघाडी गौतम भोंगळे, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते बाळासाहेब भोंगळे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष अनिस सय्यद, लहू तोतरे, महादेव पलाटे, उमेश कर्डीले, सुरेश वैद्य, आकाश अंगरख, राहुल सोनवणे, भागवत शिंगाडे, समीर सय्यद, राजू वीर, माणिक गर्जे, ज्ञानेश्वर गिरी, श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डि.व्ही. अकोलकर, पर्यवेक्षक पवार सर, शिक्षक अर्जुन गायकवाड, अभिजित खोसे, प्रशांत जाधव, ज्ञानेश्वर मतकर, ज्ञानदेव उंडे, चंद्रशेखर शेटे, विद्या भडके, तांबे सर, चौधरी सर यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे