आपला जिल्हागुन्हेगारी

ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार , शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नेवासा प्रतिनिधी

ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार , शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नेवासा प्रतिनिधी  :- गावातीलच दोघा हल्लेखोरांनी पिस्तूलातून झाडलेल्या अंदाधुंदी गोळीबारात नेवासा तालुक्यातील बुर्‍हाणपूर ग्रामपंचायतचे सदस्य व किक बॉक्सिंगचा आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण (वय २३) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान गोळ्या झाडून हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले असून हल्ल्यामागचे नेमके कारण समजले नाही. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, संकेत चव्हाण हे मंगळवार (ता. १५) रोजी घोडेगाव येथून आपले काम आटोपून आपल्या वाहनातून बर्‍हाणपूर गावी जात असताना ते बर्‍हाणपूर-चांदे रस्त्यावर घरापासून पाचशे फुटावर  रात्रीचे नऊ वाजण्याच्या दरम्यान रस्त्याचे कडेला वाहन उभे करून लघुशंका करत असताना दुचाकीवरून  आलेल्या बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर या गावातीच हल्लेखोरांनी पिस्तूलातून  संकेत यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. रात्रीची सर्वत्र शांतता असल्याने या गोळीबाराचा आवाज सर्वत्र घुमल्याने संकेतच्या वाडीलांसह चुलत बंधू रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत संकेतला त्याच्याच वाहनातून प्रथम जिल्हा रुग्णालयात व नंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
संकेतवर बुधवार (ता. १६) रोजी पहाटे यशस्वी शास्रक्रिया करण्यात येऊन त्याच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती संकेतच्या नातेवाईकांनी दिली आहे.  दरम्यान घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे, शनीशिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संकेत यांनी हल्लेखोर ओळखले
संकेत चव्हाण यांनी गोळ्या झाडणार्‍या बाळासाहेब हापसे व विजय भारशंकर या दोघाही हल्लेखोरांना ओळखले असल्याची माहिती त्यांना दवाखान्यात घेऊन जाणारे बंधू रवींद्र यांनी दिली. दरम्यान हल्लेखोर हे गावातीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून ते घटनेनंतर गावातून फरार आहेत. विशेष म्हणजे आरोपी दोघे  दुचाकीसह कांगोणी फाट्यावर अनेकांना दिसले.
अन्यथा आंदोलन
संकेत यांच्या हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास न लागल्यास नगर- औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा छावा क्रांती मोर्चा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव चव्हाण, तालुका तालीम संघाचे संदीप कर्डीले, जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे स्वप्नील वारुळे यांच्यासह बर्‍हाणपूर ग्रामस्थांनी दिला.
याप्रकरणी  आरोपी आरोपींची ओळख पटली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना असून लवकरच आरोपी अटक होतील.
– सपोनि. सचिन बागुल, शनिशिंगणापूर.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे