आपला जिल्हा

शेवगाव येथे 102 वा अभिषेक सोहळा मा पं. समिती सभापती अरुण पाटील लांडे यांच्या हस्ते

शेवगाव news18marathi

शेवगाव तालुक्यातील शिवभक्तांच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अर्धकृती पुतळ्याचा अभिषेक कार्यक्रम सुरू आहे. हा 102 वा अभिषेक सोहळा मा पं. समिती सभापती अरुण पाटील लांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजक चंद्रकांत लबडे (महाराज) म्हणाले आम्ही गेल्या 3 वर्षा पासून शिव अभिषेक मोहिम राबवत आहोत.या मुळे चौकात मुर्ती ची स्वच्छता राहते.
      यावेळी पाटील म्हणाले की, शिवरायांचा अभिषेक सोहळा हा स्तुत्य कार्यक्रम तरुणांनी हाती घेतला ही खरंतर कौतुकाची बाब आहे. असे कार्य करणारा हा ग्रुप महाराष्ट्रातील दुर्मिळातील दुर्मिळ आहे. यानिमित्ताने शिवरायांच्या कर्तुत्वाचे व विचारांचे स्मरण होते ही काळाची गरज आहे. आपण आपल्या घरी जशी देवांची पूजा त्यांचा अभिषेक करतो तसा छत्रपती शिवरायांचा देखील केला जावा ते आपल्यासर्वांचे दैवतच आहेत. कित्येक ठिकाणी महात्म्यांचे, शूरवीरांचे पुतळे उभे केले जातात, परंतु त्यांचे पावित्र्य, स्वच्छता राखली जात नाही. हे कार्य या निमित्तानं होते ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या पुढे नतमस्तक होण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे.
      अभिषेक वर्णन –  प्रथम चौक स्वच्छ धुवून घेतला जातो नंतर दूध दही ने अभिषेक करुन पुष्पहार अर्पण केला जातो व आरती करून प्रसाद वाटप करण्यात येतो. या वेळी डाॅ.निरज लांडे, डाॅ. देहाडराय,अजिंक्य लांडे, चंद्रकांत लबडे, रोहित काथवटे, दिनेश वाणी,अशोक आहेर, कृष्णा मडके, योगेश डोंगरे, कल्याण घोणे, विशाल मडके, शिवाजी गवांदे,अशोक नलगे, शिवाजी भोसले,दिपक उगले, वैभव सुरासे, अक्षय खोमणे, आदी उपस्थित होते.
      
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे