आपला जिल्हा

फळविक्रेते व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या.. शहर काॅग्रेस कमिटी ची मागणी

नेवासा :-

नेवासा शहरातील फळविक्रेते व्यापाऱ्यांना त्वरीत स्वतंत्र जागा उपलब्ध करून त्याठिकाणी गाळ्याची सोय निर्माण करुन द्यावी अशी मागणी नेवासा शहर काँग्रेसने नेवासा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्याकडे

निवेदनाद्वारे केली आहे.
नेवासा नगर पंचायत स्थापन होवून पाच वर्षे पूर्ण होत आली सुरुवातीला भाजप तर सध्या शिवसेना पक्षाची सत्ता नगरपंचायत वर आहे परंतु या कार्यकाळात फळं विक्रेते व्यापाऱ्याचा व्यापार करण्यासाठीच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही आजही रस्त्याच्या मध्ये हातगाड्या लावून व्यवसाय सुरू आहे परंतु तोही प्रशासन वाहतुकीच्या नावाखाली करून देत नाही, कधी पोलिस स्टेशन तर कधी नगरपंचायत, कधी तहसीलचे कर्मचारी व्यापाऱ्यांना आपल्या गाड्या काढुन घेण्यासाठी धमकावत असतात या अगोदर हा प्रश्न तीव्र बनुन याविरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलने देखिल केली आहेत,
हा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यात यावा यासाठी आज नेवासा शहर काँग्रेसचे पदाधिकारी व फळविक्रेते व्यापारी यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा करून काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले .
यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी फळविक्रेते व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच व्यापाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असे स्पष्ट केले,
शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या ,जनतेच्या विविध प्रकारच्या समस्याबाबत वेळोवेळी आवाज उठवून त्या सोडवण्यासाठी लढा देणार असे स्पष्ट केले,
यावेळी संघटक संदीप मोटे ,शहर उपाध्यक्ष मुसा भाई बागवान ,हनिफ बागवान, आशपाक बागवान, इस्लाम बागवान, राहुल भोसले,सलमान बागवान, गणेश भोसले, अल्ताफ बागवान, अनिस बागवान, फरहान बागवान, रेहान बागवान, संतोष चव्हाण, दिपक राक्षे, रिजवान बागवान आदींसह नेवासा काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे