आपला जिल्हा

जुनी पेन्शन योजनेच्या माहितीचा अहमदनगर जिल्हा कृती समिती कडून आढावा

अहमदनगर

जुनी पेन्शन योजनेच्या माहितीचा अहमदनगर जिल्हा कृती समिती कडून आढावा

अहमदनगर  जिल्हा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित विनाअनुदानित जुनी पेन्शन योजना कृती समितीच्या वतीने आज अहमदनगर येथे वेतन विभागाकडून मागवलेल्या माहितीचा आढावा घेण्यात आला संगमनेर,अकोले,श्रीगोंदा,पारनेर,शेवगाव,नेवासा,श्रीरामपूर,कर्जत जामखेड,पाथर्डी,कोपरगाव,राहाता, नगर तालुका,राहुरी,तालुक्यातून मागवलेल्या जुनी पेन्शन योजनेचा पेन्शन योजनेचे राज्यस्तरीय नेते अभ्यासू व्यक्तिमत्व सुनील भोर सर,जिल्हा माध्यमिक सोसायटीचे राज्याचे नेते संचालक महेंद्र हिंगे सर,माध्यमिक शिक्षक संघटनेचे रमजान हवालदार यांनी आढावा घेतला .तालुकानिहाय योग्य माहिती शासनाकडे जावी म्हणून अहमदनगर जिल्हा जुनी पेन्शन योजना कृती समिती प्रयत्न करत आहे .आज अहमदनगर येथे जिल्हा कृती समितीचे सदस्य एकत्र आले होते त्यावेळी प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेले व नंतर 100 %अनुदानावर आलेल्या राहिलेल्या शाळांनी त्वरित माहिती सादर करण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले .संजय वाळे, संजय भुसारी सर,देविदास खेडकर, सोसायटीचे संचालक आण्णासाहेब ढगे,जाकीर सय्यद, सतीश गांजुरे सर , सुदाम दळवी ,सोमनाथ रेवडकर,पांडुरंग उगले, देविदास लांडगे, झावरे सर पारनेर ,प्रशांत गडकर, सतीश सातपुते, मुख्याध्यापक श्री गोरक्षनाथ आवारी सर व श्री मंडलिक सर उपस्थित होते.यावेळी जिल्हा कृती समितीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे