आपला जिल्हा

चापडगाव शाळेत क्रीडा साहित्याचा लोकार्पण सोहळा संपन्न.     

शेवगाव

शेवगाव तालुक्यातील चापडगाव शाळेसाठी क्रीडा विभागाकडून प्राप्त झालेल्या सहित्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष कल्याणराव नेमाने हे होते. तसेच कोरोना प्रादूर्भावाचा  धोका लक्षात घेऊन अगदी कमी माणसांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न करण्यात आला असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून शाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी क्रीडा विभागाकडे प्रस्ताव सादर करून, त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करत शाळेतील मुलांसाठी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे खेळाचे साहित्य उपलब्ध केले, त्याबद्दल श्री कल्याणराव नेमाने यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले, तसेच शाळेसाठी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी आहोत असे आश्वासनही दिले.

        याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच शहादेव पातकळ, उपसरपंच सुरेशराव नेमाने, ग्रा.पं. सदस्य बंडू पातकळ, संतोष पातकळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोठूळे, उपाध्यक्ष नानासाहेब गोरे, विषय तज्ज्ञ फपाळ साहेब, केंद्रप्रमुख गिऱ्हे साहेब, योगेश खेडकर सर, अमोल वाल्हेकर सर, निलकंठ आमले सर, आदी उपस्थित होते. 

       याप्रसंगी मुख्याध्यापक  भगत सर यांनी बोलतांना म्हणाले की,  भावी आयुष्यातील कणखर पिढी घडवण्यासाठी खेळाचे किती महत्त्व आहे याबाबत व  प्राप्त झालेल्या खेळाच्या साहित्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूराव आर्ले सर यांनी केले सूत्रसंचालन रणजीत गटकळ सर यांनी केले तर आभार श्री संजय गितखने सर यांनी मानले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे