आपला जिल्हा

सामूहिक राजीनामासत्र आज शेवगाव मध्ये दुसऱ्या दिवशीही सुरू

अहमदनगर news18marathi टीम

खा. प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले, केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज भाजप पदाधिकार्‍यांचे राजीनामे सत्र आजही चालू आहे. दि. 12 रोजी  सकाळी मुंडे चौकामध्ये एकत्र येऊन‌ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रीतीने आप आपले राजीनामे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपवले. यामध्ये प्रामुख्याने शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष ताराभाऊ लोंढे यांनी व भाजपा महिला अध्यक्षा आशाताई गरड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गंगा खेडकर, सचिन वारकड युवा मोर्चा शेवगाव तालुका अध्यक्ष, उमेश भालसिंग युवा मोर्चा उपाध्यक्ष, राजेंद्र डमाळे भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष, संदीप वाणी सरचिटणीस भाजपा तालुका, नवनाथ कवडे सरचिटणीस भाजपा तालुका, केशव आंधळे तालुका सरचिटणीस, कैलास सोनवणे कार्यालयीन अध्यक्ष, शिवाजीराव भिसे तालुका उपाध्यक्ष भाजपा, सुभाष बडधे,भाजपा,सुधीर जायभाई बुथ प्रमुख थाटे वाडगाव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला,
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे