आपला जिल्हा

अशोक गाढे यांनी दिला भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा जिल्हाद्यक्ष पदाचा राजीनामा

अहमदनगर news18marathi टीम

केंदीय मंत्रिमंडळात प्रीतम ताई मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तरात डावल्याने शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील पंकजाताई मुंडे समर्थक अशोक गाढे यांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा जिल्हाद्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे तालुक्यात मुंडे समर्थकाकडून राजीनामा सत्र सुरूच आहे
या वेळी बोलतांना ओबीसी युवा मोर्चा जिल्हाद्यक्ष अशोक गाढे म्हणाले की
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी तळागळात नेऊन पक्ष वाढीचे काम केले त्याच
स्व. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजाताई व प्रीतम ताई मुंडे यांना वेळोवेळी डावलण्याचे काम पक्ष नेतृत्व करत असुन लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी निवडुन येणाऱ्या व दोन पंचवार्षिक खासदार असलेल्या डॉ प्रीतम ताई यांना मंत्रिमंडळातुन डावलल्यामुळे मुंडे समर्थकामद्य नाराजीचा सूर असुन आमच्या मार्गदर्शक पंकजाताई ह्या सर्वेसर्वा असल्याचे ओबीसी युवा मोर्चा जिल्हाद्यक्ष अशोक गाढे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे