आपला जिल्हा

कुकाणा गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वयीत…

कुकाणा :-

 

नेवासा तालुक्यातील कुकाणा गावात पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांचे संयुक्त उपक्रमातून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली आहे.

या ग्राम सुरक्षा मोबाईल अँपव्दारे गावातील रेशन, रॉकेल, ग्रामपंचायत मधील सरकारी योजना, ग्रामसभा, सरकारी कार्यालयाकडून दिली जाणारी माहिती तसेच गावामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर चोरी, दरोडा, आग लागणे, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, दागिने चोरीला जाणे, दुकान फोडणे, बिबट्याचा हल्ला, विषारी सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा गावांमध्ये येणे, निधन वार्ता इत्यादी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून चोरी दरोडा घटनांची माहिती तत्काळ मिळून अशा घटनांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
या यंत्रणेत सरपंच सौ. लताबाई विठ्ठल अभंग,उपसरपंच सौ. शुभांगी सोमनाथ कचरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग,ग्रामविकास अधिकारी दादासाहेब आरगडे,ग्रामपंचायत सदस्य एकनाथराव कावरे,मच्छिंद्र जाधव,श्रीमती आशाबाई रामदास खराडे. सौ. हकीमाबी लालाभाई शेख,
रज्जाक निजामशाह इनामदार, सुनिल गुलाब गोर्डे ,सौ.अनुराधा गणेश निकम,भाऊसाहेब फोलाने,इकबाल इनामदार,सौ. सुजाता विलास देशमुख, दौलतराव देशमुख,सौ.छाया कारभारी गोर्डे,सौ.शिवगंगा उमाकांत सदावर्ते, स्वस्त धान्य दुकानदार अमोल पंडित,
कामगार तलाठी प्रदीप चव्हाण, कोतवाल जॉय ओहळ,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन गोर्डे आदींचा गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभाग असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आपला नंबर नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा
18002703600 हा हेल्पलाईन नंबर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे