ब्रेकिंग

मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड शेवगाव तालुका कार्यकारिणी जाहीर.

जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सिमा लक्ष्मण मडके तर मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी विजयराव देशमुख व उपाध्यक्ष पदी विष्णू घनवट यांची निवड 

राजकीय व सामाजिक पातळीवर आरक्षण अभावी मराठा समाजात गेल्या काही दिवसापासून मरगळ आली आहे. त्यामुळे समाजाच्या संघटीत प्रयत्नातून भविष्यात वाटचाल करावी लागणार आहे. इतर समाजाला बरोबर घेवून तळागाळातील कष्टकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सेवा संघाची धडपड सुरु आहे. नवीन पिढीतील युवकांना नोकरी, उदयोग व व्यवसाय उभारणीसाठी सामुदायीक प्रयत्न करु. कार्यकारीणीतील नवीन पदाधिका-यांनी मराठा समाजातील सामाजिक व आर्थिक दरी कमी करण्याचे काम करावे. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा अ.नगर महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी

    मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड तालुका कार्यकारीणीची निवड करण्यासाठी संघाचे जिल्हाध्यक्ष इथापे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव येथील स्वराज मंगल कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संपुर्णा सावंत, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, मावळते तालुकाध्यक्ष राजेंद्र झरेकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनाले, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्रा.किसन माने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा महासचिव मुन्ना बोरुडे, माजी सरपंच सतीष लांडे, विक्रम दारकुंडे, कल्पना ठुबे, पंचायत समितीचे संचालक मंगेश थोरात, श्रध्दा पवार, संतोष ढोले आदी प्रमुख उपस्थित होते.  

     मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी उदयोजक विजय देशमुख, उपाध्यक्ष विष्णू घनवट तर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष ठाकुर निमगाव ग्रामपंचायत सदस्या सिमा लक्ष्मण मडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिका-यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शरद जोशी, माऊली खबाले, चद्रकांत लबडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, पांडुरंग देशमुख तात्या लांडे, अरुण लांडे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी झरेकर, प्रा. माने, दारकुंडे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवाजीराव देवढे यांनी तर सुत्रसंचालन सर्जेराव तानवडे यांनी केले, तर सुनील काकडे यांनी आभार मानले.

शेवगाव : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी उदयोजक विजय देशमुख, उपाध्यपदी विष्णू घनवट व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी सिमा लक्ष्मण मडके यांची निवडीनंतर त्यांचा सत्कार करतांना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संपुर्णाताई सावंत व इतर मान्यवर

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे