आपला जिल्हा

दुराचारी अनाचारी सरकार घालविण्यासाठी युवा वॉरियर्स ने पुढाकार घेऊन कार्य करावे… माजी मंत्री बावनकुळे

अकोले भाऊसाहेब वाकचौरे :-

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी ,मराठा आरक्षण गेले .अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नती आरक्षण गेले. न्यायालयाने ओबीसी चे आरक्षण रद्द केले नाहीतर आरक्षण द्यायचे असेल तर तीन महिन्यात डाटा तयार करा असे सांगितले ते करण्याऐवजी मंत्री वड्डेटीवार चिंतन बैठका घेतात तर मंत्री भुजबळ मोर्चे काढतात मंत्री मोर्चे काढतात का?असा सवाल उपस्थित करून डेटा देण्याचे काम हे केंद्र सरकारचे नाही तर राज्य सरकारचे आहे.स्थानिक स्वराज्य संस्था राज्य सरकारच्या अधिपत्याखाली चालतात डिसेंबर पर्यंत सरकारने डाटा दिला नाही तर राज्यातील मंत्र्यांना अडवून युवा वॉरियर्स माध्यमातून जाब विचारला जाईल व पहिले काम मी करेल असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत बावनकुळे यांन बोलताना केले.


अकोले येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हा आढावा बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपाध्यक्ष सचिन तांबे, कपिल पाटील, योगेश मैद, अनुप मोरे, अनिकेत पाटील, किरण बोरुडे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा अध्यक्ष श्रीराज डेरे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, सभापती उर्मिला राऊत, जिप सदस्य कैलासराव वाकचौरे, जीप गटनेते जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अरुण शेळके, वसंतराव मनकर, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे भाजपा युवा मोर्चा,राहुल देशमुख, आदी उपस्थित होते.


चंद्रकांत बावनकुळे यांनी मंत्री नितीन राऊत यांनी गरीब माणसाचे १०० युनिट वीज बिल सात हजार कोटीची माफ करू मी विरोधी पक्षाचा असून देखील त्यांनी गरिबांना न्याय देण्याचे ठरविले म्हणून अभिनंदन केले.मात्र आठ महिने उलटून गेले तरी माफी का होईना म्हणून त्यांना भेटलो ते म्हणले फाईल वर अजितदादा सही करत नाही.मग अजितदादांना भेटलो ते म्हणाले उद्धव ठाकरेंना भेटा मग एकदा पुन्हा राऊत यांना भेटलो ते म्हणले हे काम सरकारचे आहे .मी काय करू मग सरकारमध्ये कोण आहे.असा सवाल उपस्थित केला.
विक्रांत पाटील यांनी तीन माकडांचे सरकार असून या सरकारच्या काळात युवक युवतीवर अन्याय केले जातात व सरकारमध्ये मंत्री, युवाध्यक्ष हे कृत्य करत असून यापुढे प्रतेक गावातील तरुण युवा वॉरियर्स माध्यमातून सरकारी अधिकारी, मंत्री यांना अन्यायविरोधा मध्ये जाब विचारेल. तालुक्यात आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून युवकांची सक्षम फळी उभारून विकास कामे करू.
वैभव पिचड यांनी आघाडी सरकारच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करून तालुक्यात युवकांचे जाळे विणले जाईल असे आश्वासन दिले.
प्रास्तविक युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे यांनी तर सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, आभार सरचिटणीस योगीराज परदेशी यांनी मानले.
भारतीय जनता युवा मोर्चा चे शाखा उदघाटन झाले त्याला गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच युवकांच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाची जोरदार बांधणी करून भाजपचे कार्य,विचारधारा,विकास कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. युवकांना भाजपमध्ये जास्तीतजास्त काम करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून आज भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते व अकोले तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा वारीयर्स  शाखा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
माजी आमदार वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखालीअकोले मध्ये भाजपची युवकांची जोरदार बांधणी करत अकोले तालुक्यातील युवा वारीयर्स शाखा उदघाटन सोहळा गणोरे , देवठाण ,विरगाव, अकोले महात्मा फुले चौक, इंदिरानगर, अकोले, सुगाव फाटा,कळस बुद्रुक, कळस खुर्द येथे शाखांचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी साठी जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, सुनील उगले, तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा राहुल देशमुख, सुशांत वाकचौरे, भूषण जाधव, सरचिटणीस भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, मदन आंबरे, विजय पवार, प्रतीक वाकचौरे, सौरभ देशमुख यांनी यशस्वी केला

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे