महाराष्ट्र

सकल मराठा सोयरीक ग्रुप उपक्रम: ऋणानुबंध जोडण्यासाठी विवाहइच्छूक वधू-वरांसाठी ‘सोयरीक संवाद अभियान’ आज शुभारंभ,नावनोंदणीसाठी ओळखीचा पुरावा अवश्यक

पुणे - News18 मराठी

 – मानवी जीवनातील विविध संस्कारांपैकी विवाह हा एक अत्यंत पवित्र संस्कार आहे. संस्काराच्या निमित्ताने दोन मने, दोन कुटुंब, दोन गावे पिढ्याने पिढ्यांसाठी एकत्र येत असतात. तथापि, चांगले स्थळ मिळण्याच्या शोधात प्रत्येक पालक असतो. आज घडीला स्थळे  जुळवितांना पालकांची होणारी दमछाक पाहता मराठा समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व मराठा समाजातील विविध वधु-वर सुचक केंद्र व विवाह संस्था एकत्र येऊन www.sakalmarathasoyrik.com या संकेतस्थळाची निर्मिती केली असून या माध्यमातून ना नफा…. ना तोटा… ना एजंट या तत्त्वावर सेवा दिली जात असल्याने ७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्ताने १५ ऑगस्ट ते २२ऑगस्ट रक्षाबंधन या सणापर्यत ‘सोयरीक संवाद अभियान’ अंतर्गत सकल मराठा समाजातील विवाहइच्छूक वधू-वर यांची मोफत नावनोंदणी करुन घेण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा सोयरीक ग्रुप चे समन्वयक जयकिसन वाघ यांनी दिली. 

 

धावपळीच्या व बदलत चाललेल्या समाजव्यवस्थेमध्ये ऋणानुबंध जुळवताना येणाऱ्या अडचणी अनंत आहेत. आज काल संवाद हरवत चालला आहे. प्रत्येकाची जगण्यासाठी धावपळ सुरू असते.अश्यावेळी उपवर मुला-मुलींचे विवाह जुळवताना त्यांच्या पालकांना बऱ्याच अडचणी येतात. आमच्याकडे वर आहे, वधू आहे. एखादे सुयोग्य स्थळ सुचवा. असे शब्द त्यांच्याकडून ऐकावयास मिळतात योग्य स्थळ शोधण्यासाठी पालकांची बरीच दमछाक होते. एकंदर सर्व परिस्थिती असताना तसेच यामध्ये सोयरीकीच्या नावाखाली बाजारू प्रवृत्तीचा शिरकाव करत असताना स्थळे शोधण्यासाठी सामाजिक जाणिवेतून आपण काहीतरी केले पाहिजे. असा विचार करून सामाजिक कार्यकर्ते जयकिसन वाघपाटील यांच्यासह त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांची मराठा वधु-वर सुचक केंद्र आणि विवाह संस्था चालकांची बैठक घेऊन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग घेत हजारो स्थळे एका क्लिकवर पाहता येतील यादृष्टीने

www.sakalmarathasoyrik.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.या संकेतस्थळावर अनेक उच्चशिक्षित, शिक्षित,उद्योजक,वैद्यकीय क्षेत्रातील विवाहइच्छूक वधुवरांची नोंदणी झालेली असून नावनोंदणीसाठी उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील मराठा समाजातील अनेक मराठा वधु-वर सुचक केंद्र व विवाह संस्था यांनी मराठा समाजातील विवाहइच्छूक वधु-वरांचे विवाह वेळेवर जुळवून यावे या साठी स्वातंत्र्यदिनापासून रक्षाबंधन या सणापर्यत ‘सोयरीक संवाद अभियान‘च्या माध्यमातून सकल मराठा समाजातील विवाहइच्छूक वधू-वरांनी www.sakalmarathasoyrik.com या वेबसाईटवर सकल मराठा उपजाती मधील वधु-वरांची नावनोंदणी करुन आपली संपुर्ण माहिती फोटो सह भरुन वेबसाईटवर फोटो व बाॅयोडाटा अपलोड करावा, व 9130950999 या नंबर वर फोटो बाॅयोडाटा पाठवुन नविन व्हाटसअॅप ग्रुप ला अॅड व्हावे नाव नोंदणी करतांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळख पत्र, असा सक्षम पुरावा दिल्यास प्रोफाईल अॅक्टीव केले जाणार आहे .अपूर्ण माहिती, ओळखीचा पुरावा सादर न केल्यास प्रोफाईल अॅक्टीव केले जाणार नाही.(नावनोंदणी अथवा अन्य करण्यासाठी सकल मराठा सोयरीक ग्रुप कडून कधीही फोन वगैरे केला जात ) या ‘सोयरीक संवाद अभियान’ च्या माध्यमातून सकल मराठा सोयरीक ग्रुप हि मध्यस्थाची भुमिका पार पाडणार असून एकमेकांना अनुरुप स्थळे शोधण्यासाठी मदत करणार आहे. विशेष म्हणजे या संकेतस्थळामध्ये वधुवरांची माहिती संपादित करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सामाजिक जाण व भान ठेवून कार्यकर्त्याच्या उदात्त हेतूने हे कार्य आम्ही करीत असल्याचे या संकेतस्थळाचे मुख्य ॲडमिन जयकिसन वाघपाटील यांनी सांगितले. यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,विवाह जोडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सध्या बाजारू प्रवृत्ती दाखल झाली आहे. हजारो,शेकडो रुपयांची मागणी करून लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून, पालकांकडून, वधू-वरांकडून पैसे घेतले जात आहेत. यातून अनेकांची फसवणूक झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आशा एकूणच परिस्थितीत आपल्या गाव खेड्यातील, शहरातील पालकांना आपल्याच भागातील, नात्यागोत्यातील योग्य स्थळे आणि तेही मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही

 

www.sakalmarathasoyrik.com ची निर्मिती केली आहे.सध्या संकेतस्थळावर सकल मराठा समाजातील स्थळे उपलब्ध करण्यात आली आहे.

सकल मराठा समाज बांधवांनी आपणही या संकेत स्थळाला भेट देऊन विवाहइच्छूक वधू-वर व त्यांच्या पालकांनी सोयरीक संवाद अभियान च्या माध्यमातून आपल्या नात्यातील व समाजातील विवाह योग्य मुला-मुलींच्या पालकांना सोयरीक संवाद अभियान कार्याची माहिती द्यावी असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या कार्यकारिणी मंडळाने केली आहे  अधिक माहितीसाठी 9130950999 या नंबर वर संपर्क साधावा

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे