ब्रेकिंग

प्रस्थपित राजकारणाला वंचित बहुजन आघाडी पर्याय ठरणार -प्रा किसन चव्हाण

अहमदनगर news18marathi

गरीब मराठयासह बहुजनांचा इथल्या सर्वच राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वोट बॅंक म्हणून वापर केला त्यातूनच सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकीय सत्तेचं समीकरण रूढ झाल आहे आणू त्यातूनच राज्यात घराणेशाही सरंजामशाही जन्माला आली, परंतु येणाऱ्या काळात या प्रस्थापित घराणेशाही च्या राजकारणाला वंचित बहुजन आघाडी पर्याय ठरणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीची राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी केले.
शेवगाव येथील ममता लॉन्स मध्ये पार पडलेल्या तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते, बैठकीला वंचित चे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,-शेवगाव नगर परिषद निवडणुक साठी पक्षाचे निरीक्षक डॉ नितीन सोनवणे हे उपस्थित होते. बैठकीत बोलताना प्रा चव्हाण म्हणाले जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे पक्ष नेते मात्र स्वतःचे कारखाने,बॅंका ,मार्केट कमिट्या, या कुरण असलेल्या संस्थेच्या निवडणुका मात्र आपआपसात समझोता करून बिनविरोध करतात ,स्थानिक निवडणुकीत राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न देता पुढाऱ्यांच्या घरातील लोकांनाच उमेदवाऱ्या दिल्या जातात मात्र वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असेही चव्हाण म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे डॉ नितीन सोनवणे, बनोभई शेख, प्यारेलाल शेख,रवींद्र बोरुडे,शाहूराव खंडागळे,सुनीता जाधव यांचीही मनोगते झाली यावेळी तालुक्याच्या वतीने प्रा किसन चव्हाण यांच्या आंदकोळ या आत्मकथनाचा सोलापूरच्या विद्यापीठात बी ए च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश खंडागळे,गोरख वाघमारे,सागर गरुड,विठ्ठल मगर,कैलास चोरमाले, विष्णू वाघमारे,अशोक लोढे पाटील,धोंडीराम मासाळ, मुकेश मानकर,लक्षमन मोरे,सचिन खंडागळे,दीपक साळवे सागर हवाले ,रमेश खरात,संजय कुऱ्हाड़े, आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तरुणाची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संजय चव्हाण तर आभार भारत मिसाळ यांनी मानले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे