आरोग्य व शिक्षण

एक नवीन रेकॉर्ड…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात दोन कोटी पेक्षा जास्त लसवंत

दि. 17/09/2021 रोजी  भारताने एका दिवसात २ कोटी लसीकरणाचा टप्पा पार करताना जागतिक विक्रम तर केलाच आहे. पण त्या पलीकडे सरकारी पातळीवर असं अभियान राबवलं जाऊ शकते हे जगाला दाखवून दिलं आहे. या लसीकरण अभियानात १ लाखापेक्षा जास्ती सेंटर सरकारी पातळीवर सुरु केले होते, तर ३५०० हे प्रायवेट आहेत. यावरून अंदाज लावू शकतो की जास्तीत जास्त लोकांना मोफत कोरोना लस मिळालेली आहे.

ही एक क्रांती आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. २ कोटी लस उपलब्ध करणे, त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे, लसीकरण करण्याची यंत्रणा निर्माण करणे आणि त्याचवेळी त्याची नोंद घेणं हे सगळं नक्कीच अभूतपूर्व आहे.

आजचा रेकॉर्ड बनवण्यासाठी औचित्य कोणतंही असलं तरी गळ्यात १०- १० किलोचे हार आणि मोठा मोठाले केक कापून ते साजरं करण्यापेक्षा अश्या पद्धतीचं निर्धारित केलेलं लक्ष्य गाठणं हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.

आजचा जागतिक विक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या सर्व कोविड योद्धांना news18मराठी टीमचा कडक सॅल्यूट. सर्व सरकारी यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, स्वयंसेवी संस्था, लसी बनवणाऱ्या कंपन्या, त्यांचे कर्मचारी आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारी यंत्रणा आणि अनेक अव्यक्त पडद्यामागील चेहरे सर्वांना news18मराठी टीमचा नमस्कार.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे